गेल्या अनेक वर्षापासून नागरीकांचा गुंतवणूकीकडे कल वाढला आहे. नोकरीसोबत अनेक लोक विविध ठिकाणी पैसे गुंतवणूकीचा मार्ग शोधत आहेत. अशा नागरीकांसाठी पोस्ट ऑफिसची (Post office) किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme) खुप फायदेशीर आहे. अलीकडेच सरकारने या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळणार आहे.


किती व्याज मिळतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) हा गुंतवणूकीसाठी खुप चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून किसान विकास पत्रातील गुंतवणूकदारांचे पैसे 123 महिन्यांऐवजी 120 महिन्यांत दुप्पट करणार आहे. व्याजदरात वाढ झाल्यानंतर किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर 7.20 टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 123 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के दराने व्याज मिळत होते. नवीन बदलानंतर आता मॅच्युरिटी 10 वर्षांची असेल.


किती रूपयांनी सूरूवात करायची?


किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) योजनेत तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता. यानंतर, 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. या अंतर्गत एकल आणि संयुक्त खाते उघडता येते. यासोबतच गुंतवणूकदाराला नॉमिनीची सुविधाही मिळते.


कोणाला खाते उघडता येणार?


किसान विकास पत्र योजनेत (Kisan Vikas Patra Scheme)  10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते. एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या वतीने खाते उघडू शकतो आणि अल्पवयीन 10 वर्षांचे झाल्यावर खाते त्यांच्या नावावर हस्तांतरित केले जाते.


कसे खाते उघडता येणार?


किसान विकास पत्र योजनेत (Kisan Vikas Patra Scheme) खाते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही जोडावे लागेल. यानंतर, तुम्ही अर्ज आणि पैसे जमा करताच तुम्हाला किसान विकास पत्राचे प्रमाणपत्र मिळेल.


दरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये (Post office) गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते, असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळेच त्याच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीक गुंतवणूक करतात.