How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे. या दोन्ही वस्तूंवर तेलकट थर जमा होतो. त्यामुळे या वस्तू स्वच्छ करणं म्हणजे डोकेदुखी ठरतं. असं असलं जो तो आपल्या परीनं या वस्तू स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. पण इतकी मेहनत घेऊनही या वस्तू स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या वस्तू कशा स्वच्छ करायचा जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वस्तू स्वच्छ करताना मास्क आणि हातमोजे घाला. एक्झॉस्ट फॅन बंद करा आणि फॅनला जोडलेले सर्व प्लग किंवा वायर डिस्कनेक्ट करा जेणेकरुन साफसफाई करताना विजेचा झटका येण्याचा धोका नाही. एग्जॉस्ट साफ करण्यासाठी सर्वप्रथम जाळी काढा आणि त्यावर लागलेला तेलकट थर स्वच्छ कारा. 


लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा - एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी  लिंबू किंवा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांसारख्या पदार्थांचा वापर करून जाळी न काढता मागील बाजूने फॅन ब्लेड साफ करू शकता. पण सर्वात आधी डिटर्जंट मिश्रित पाण्यानं ब्लेड स्वच्छ करा. त्यानंतर लिंबू किंवा व्हिनेगर आणि बेकिंग सोडाच्या मदतीने स्वच्छ कराल.


अमोनिया- गरम पाण्यात अर्धा कप अमोनिया मिसळा आणि ब्लेड्स त्याच्या मिश्रणात बुडवा. जाळी आणि ब्लेड किमान एक तास मिश्रणात बुडवून ठेवू द्या जेणेकरून सर्व घाण बाहेर येईल. आता स्क्रबरने घासून जाळी स्वच्छ करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.


लिंबू आणि मीठ- लिंबू आणि मीठाचा वापर करून एक्झॉस्ट फॅन करू शकता. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण गरम पाण्यात मिसळा आणि ब्लेडने स्वच्छ करा.


इनो आणि लिंबू - एका वाडग्यात गरम पाणी घ्या. त्यात इनो आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट काही वेळ पंख्यावर घासून ठेवा. मग तुम्ही ते स्वच्छ कापडाने पुसून टाका. तुमचा पंखा काही मिनिटांत स्वच्छ होईल.


Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, Reaction पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी


कास्टिक सोडा - कास्टिक सोड्याच्या मदतीने  किचनच्या चिमणीपासून बाथरूमच्या टाइल्सपर्यंत प्रभावी ठरतो. पण वापरताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कास्टिक सोड्याच्या संपर्कात आलं तर त्वचा आणि डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, कृपया योग्य आणि अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)