मुंबई: स्वयंपाक घरात आपलं थोडं लक्ष इकडे तिकडे झालं की गॅसवर ठेवलेला पदार्थ जळतो. काही वेळा पदार्थ ओतून जातो. दूध किंवा वरण आमटी सारखे पदार्थ हमखास ओतू जातात. आपली जरा नजर चुकायला आणि हे व्हायला एकच वेळ असते. अशावेळी आपल्याला कायम त्याकडे लक्ष द्यावं लागतं. मात्र आता तमान गृहिणी आणि स्वयंपाक करणाऱ्यांची ही समस्या दूर होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर यासंदर्भात एक हॅक व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीनं आपल्या आजीचा एक उपाय शेअर केला आहे. ही ट्रिक वापरल्यानंतर दूध किंवा गॅसवर ठेवलेला पदार्थ ओतू जात नाही असंही या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ 10 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 8 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ चक्क लाईक केला आहे. 


@luvjoongiee नावाच्या एका युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. गॅसवर पातेलं आहे आणि त्यावर एक लाकडी चमचा ठेवला आहे. ज्यामुळे पातेल्यातील उकळत असलेला पदार्थ भांड्या बाहेर पाडत नाही. या यूझरने म्हटलं आहे की मी हा प्रयोग स्वत: करून पाहिला आणि ही ट्रिक कामी आली. 


अनेक युझर्सनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. तर काही लोकांनी दूध पातेल्या बाहेर येणार की नाही असा प्रश्नही विचारला आहे. एका युझरने तर चक्क दुधारवर हा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही असा दावा केला आहे. तर काही लोकांनी यावर आणखी काही उपाय देखील सुचवले आहेत. जसे की ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकल्यास फायदा होतो. 






हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही.