कुकरमध्ये लावलेला भात शिजवताना बाहेर येतो? या सोप्या उपायाने दूर होईल समस्या
Kitchen Hacks: आपल्या कुकरचा (Cooker Tips) वापर आपल्याला योग्य पद्धतीनं करणं गरजेचे असते. नाहीतर एक चूक आपल्याला फार महागात पडू शकतं. त्यातून समजा कुकरमधून अन्न बाहेर आलंच. तर अशावेळी आपण करू शकतो हे या लेखातून जाणून घेऊया.
Kitchen Hacks: आपल्या घरात कुकरचा उपयोग फारच कॉमन आणि गरजेचा आहे. त्यातून अनेकदा कुकर लावताना शिट्टी नीट बसत नाही किंवा वाफा येत नाहीत आणि सोबतच नीट झाकणं लावलेलं असलं तरीसुद्धा त्यातून अन्न बाहेर येते, असंही अनेकदा होताना दिसते. त्यामुळे यावेळी काय करावं हेच आपल्याला समजत नाही. यावेळी वाटतं नसली तरी फार मोठ्या प्रमाणात आपली गोची होते. घरी गृहिणी या एकट्या असतील तरीही त्यांना अशा वेळी काय करावं हे काहीच सुचतं नाही. म्हणून त्यांना सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या लेखातून आपण समजून घेऊया की नक्की कोणत्या टीप्स गृहिणींनी अशावेळी फॉलो केल्या पाहिजेत. या लेखातून त्याची प्रचिती येईल की काही छोट्या चुकांमुळे कुकरमधून भात बाहेर येतो आणि आपलं अन्नही वाया जाते. अशावेळी काय करावं? हे आपण जाणून घेऊया. दुसरं म्हणजे हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी?
आपल्याला अनेकदा कुकरसाठी योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. जुन्या कुकरमध्ये भात लावला असेल तर तो बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी काय करावे हाही एक मोठा प्रश्न असतो. एकतर आपला कुकर हा स्वच्छ असणे फार महत्त्वाचे असते. त्यातून कोणत्याही प्रकारे त्यातून काही जंतू किंवा कुठले बॅक्टेरिया नाहीत ना याची काळजीही घेणे आवश्यक राहते. म्हणून वेळोवेळी आपल्या कुकरमधील पाणी हे बदलतं राहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा : Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा
कोणत्या घरगुती टीप्स वापराव्यात?
कुकरच्या शिट्टीतून पाणी किंवा अन्न, भात-दाळ बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रोज, वेळोवेळी कुकर साफ ठेवावा आणि शिट्टीही साफ ठेवावी.
त्यातून शिट्टीभोवती जर का काही घाण असेल किंवा अन्न अडकलं असेल तर ते साफ करावं.
तुम्ही शिट्टी ही गरम पाण्यात बुडवून ठेवा आणि मग त्यानुसार ती शिट्टी साफ करावी.
तुम्ही कुकरच्या झाकणावर तेल लावू शकता म्हणजे येथे काही चिकटलं तर ते कायमस्वरूपी राहणार नाही.
कुकर ठेवल्यानंतर तुम्ही गॅस कमी ठेवा, जास्त वाढवू नका.
तुम्हाला वाटलं तर कुकरच्या शिट्टीभोवती हलका कपडा किंवा टिशूही ठेवू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)