कोलकाता : KMC ELECTION RESULT 2021: कोलकाता महानगरपालिकेच्या (KMC) 144 वॉर्डातील निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. राज्य निवडणूक आयोग (EC) अधिकाऱ्यांनी सांगितले की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) सुरुवातीच्या मतमोजणीत विरोधी पक्षांवर मात मोठी आघाडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. ममता यांनी विरोधकांना मोठा पुन्हा एकदा हादरा दिला आहे. विरोधकांना चारीमुंड्या चीत करत तृणमूल काँग्रेसने मोठे  वर्चस्व राखले आहे. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, टीएमसीला आतापर्यंत प्रत्येक प्रभागात मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे.


KMC मध्ये TMCचे वादळ


टीएमसीला पहिली आघाडी 23, 11, 31, 2, 4 आणि 7 या क्रमांकाच्या प्रभागात मिळाली. यानंतर, हळूहळू कोलकात्याच्या जवळपास संपूर्ण भागात टीएमसीच्या उमेदवारांची पकड दिसूने येत आहे. कोलकाता महानगरपालिका (KMC) निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले आणि त्यादरम्यान दोन मतदान केंद्रांवर बॉम्ब फेकण्यासह हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या.


कोलकाता महानगरपालिका (KMC) निवडणुकीत, 40.5 लाख मतदारांपैकी 63 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


KMC LIVE मतदान आघाडी


एकूण - 144 प्रभाग


TMC - 133
भाजप - 3
डावीकडे - २
काँग्रेस - 2
इतर/अपक्ष- 0