एक कटींग! चहाच्या प्याल्यातून केली कोट्यवधींची उलाढाल, या पाच चहावाल्यांबाबत जाणून घ्या
चहाच्या स्टार्टअप्समधून अनेक जण कोट्यधीश झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच स्टार्टअप्सबद्दल सांगणार आहोत.
Crorepati Five Tea Sellers: चहा म्हटलं की भारतीयांचा जीव की प्राण..भारतातील एकूण कुटुंबापैकी सुमारे 88 टक्के कुटुंबीय दररोज सकाळी चहा घेतात. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 64 टक्के चहा पितात. चहा म्हणजे पाणी, साखर, चहा पावडर आणि दूध यांचं मिश्रण..चहाला अनेक ठिकाणी अमृततूल्य देखील म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का? चहाच्या स्टार्टअप्समधून अनेक जण कोट्यधीश झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच स्टार्टअप्सबद्दल सांगणार आहोत.
MBA चायवाला: एमबीए चायवाला प्रसिद्ध चहावाला आहे. प्रफुल्ल बिलोरनं हे स्टार्टअप सुरु केलं आहे. प्रफुल्लला एमबीए करायचे होते आणि त्यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करायचे होते. पण 2017 मध्ये त्याने चहा विकण्यास सुरुवात केली आणि 2019-20 या आर्थिक वर्षात 3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, त्यांनी भोपाळ, श्रीनगर, सुरत आणि दिल्लीसह 100 हून अधिक शहरांमध्ये त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे.
चाय पॉइंट: अमूलेक सिंग बिजराल यांनी 2010 मध्ये स्थापन केलेला, चाय पॉइंट माउंटन ट्रेल फूड प्रायव्हेट लिमिटेडचा भाग आहे. कंपनीचे देशभरात 100 हून अधिक आउटलेट आहेत. अमुलेक सिंग बिजराल यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले आहे. आर्थिक वर्ष 2018 मधील 88 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2020 मध्ये 190 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
चायोस: दोन आयआयटियन्स नितीन सलुजा आणि राघव वर्मा यांनी चायोस 2012 मध्ये स्थापन केली. कंपनीने आपले पहिले आउटलेट सायबर सिटी गुडगावमध्ये उघडले. आता 6 शहरांमध्ये 190 स्टोअर्स चालवत आहेत आणि 2022 च्या अखेरीस आणखी 100 स्टार्टअप्स सुरु करण्याचा विचार आहे. स्टॅटिस्टाच्या मते, 2020 च्या आर्थिक वर्षात चायोसचा महसूल सुमारे 1,000 कोटी रुपये होता.
चाय सुट्टा बार: 2016 मध्ये, अनुभव दुबे याने मित्र आनंद नायक आणि राहुल पाटीदार यांच्यासह इंदूरमध्ये चहा-कॅफे चेन 'चाय सुट्टा बार' संकल्पना सुरु केली. त्याने कुल्हडमध्ये चहा देण्यास सुरुवात केली आणि मेनूमध्ये चहा, चॉकलेट चहा, मसाला चहा, वेलची चहा, तुळशीचा चहा, केशर चहा इत्यादी इतर चवींचा समावेश केला.
चाय ठेला: पंकज न्यायाधीश याने 2014 मध्ये स्थापन केलेला 'चाय ठेला' स्टार्टअप सुरु केलं होतं. देशभरातील 35 आउटलेटसह नऊ राज्यांमधील ग्राहकांना काही स्नॅक्ससह आरोग्यदायी आणि घरगुती चहाचे प्रकार देतात. 2016 मध्ये, नोएडा-आधारित क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट चेनने 1.5 कोटी रुपये कमावले होते.