सोन्याच्या किंमती स्थिर, चांदीच्या किंमतीत वाढ
चांदीच्या किंमतीत वाढ असली तरी सोन्यानं नागरिकांना दिलासा दिलाय.
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती, भाजीपाल्याचे दर यासोबतच सोन्याच्या किंमतींकडेही सर्वांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतीत झालेल्या वाढीनंतर इतक्या तक्रारी येत नसल्या तरीही सोनं स्वस्त झालं की लगेच सराफा बाजारात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे महागाई कितीही वाढली तरी लोकांना सोन्याचं आकर्षण हे राहणारच असं म्हणता येईल. त्यात आता लग्न सराईचे दिवस सुरू झाल्याने तर सोन्या-चांदीला विशेष महत्व प्राप्त झालंय. आज चांदीच्या किंमतीत वाढ असली तरी सोन्यानं नागरिकांना दिलासा दिलाय.
सोनं 320 रुपयांनी कमी होऊन 32 हजार 220 रुपये प्रति 10 ग्राम झाले. स्थानिक ज्वेलर्सच्या कमी मागणीमुळे दर कमी असणं हे यामागचं कारण असल्याचं म्हटलं जातंय. जागतिक स्तरावरही सोन्याचे दर कमी झाले आहेत.
दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. आज चांदीचे दर 250 रुपयांनी वाढून 38 हजार 800 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी निर्मात्यांकडून वेगाने आलेल्या मागणीचा हा परिणाम म्हटला जातोय. दिल्लीमधे 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचं सोनं 320 रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 32 हजार 220 रुपये आणि 32 हजार 070 रुपये प्रति 10 ग्राम झाले.