नवी दिल्ली : 'आयआरसीटीसी'मधून तिकीट बुक करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. IRCTCमध्ये लॉगिन करुन तिकीट बुक करता येतं. पण अनेक प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत तिकीट काढताना अडचणी येतात. अशावेळी तात्काळ तिकीट काढावं लागतं. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉरपोरेशनच्या (IRCTC) वेबसाइटवरुन तात्काळ तिकीट बुक करता येऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमीत कमी २४ तास आधी तात्काळ तिकीट बुक करता येऊ शकतं. एसी क्लाससाठी बुकिंग सकाळी १० वाजता सुरु होतं. तर नॉन एसीचं बुकिंग सकाळी ११ वाजता सुरु करण्यात येतं.


कसं बुक कराल तात्काळ तिकीट -


- तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी IRCTCच्या वेबसाईटवर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.


- त्यानंतर IRCTC तात्काळ ऑटोफिल फॉर्मवर क्लिक करा.


- आता पॅसेंजर डिटेल्स भरुन सबमिट बटणवर क्लिक करा.


- त्यानंतर तुमचं तात्काळ तिकीट बुक होईल.


किती खर्च येईल? 


तात्काळ तिकीटाचे दर आधीपासून ठरलेले असतात. सेकंड क्लाससाठी बेस फेअरपेक्षा १० टक्के अधिक असतात. तर सेकंड क्लासच्या तिकीटासाठी तात्काळचा चार्ज ३० टक्के अधिक असतो. तिकिटांवर लागणार तात्काळ चार्ज ट्रेनच्या अंतरावरुनही निश्चित केला जातो.


तिकीट रद्द केल्यास  रिफंड मिळतं का?


तात्काळ तिकीट रद्द केल्यावर कोणताही रिफंड मिळत नाही. तात्काळ तिकिटं कन्फर्म असलेल्या तिकिटांसाठीच रिफंड मिळू शकतं. वेटिंग असणाऱ्या तात्काळ तिकीटावर रेल्वेच्या नियमांनुसार, पैसे कपात करुन रिफंड दिला जातो.


  


कॅन्सलेशन चार्ज किती? 


कन्फर्म असलेलं तिकीट प्रवासाआधी ४८ तास आधी रद्द केल्यास, AC फर्स्ट क्लासच्या तिकिटावर २४० रुपये चार्ज लावला जातो. AC २ टीयरच्या तिकिटावर २०० रुपये चार्ज आकारला जातो. AC ३ टियर/एसी चेयर कार/एसी ३ इकोनॉमी तिकिटासाठी १८० रुपये चार्ज घेतला जातो. स्लीपरसाठी १२० रुपये आणि सेकंड क्लाससाठी ६० रुपये कॅन्सलेशन चार्ज लावला जातो.