हैदराबाद :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि उद्योगपती इवांका ट्रम्प सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. हैदराबाद येथे  जागतिक उद्योजक परिषदेत इवांका सहभागी झाली. 


चार वेगवेगळे ड्रेस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात चार ठिकाणी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये ती दिसून आली. यांची किंमत लाखोंच्या घरात होती. यामधील एक ड्रेस भारतीय डिझायनरने डिझाइन केला होता तर बाकीचे वेगवेगळ्या देशातील डिझायनर्सने डिझाइन केले होते.


इवांकावर साऱ्यांचे लक्ष 



आजपर्यंत अनेकदा राष्ट्राध्यक्ष किंवा सत्तेतील काही मंत्री मंडळी परदेशातून भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. मात्र इवांका डोनाल्ड ट्रम्पशिवाय भारतात आल्याने अनेकांचे लक्ष तिच्यावर खिळले आहे. इवाका पहिल्या भारत दौऱ्यात २८ ते ३० नोव्हेंबर पर्यंत हैदराबाद येथे राहिली. दरम्यान तिने भारताच्या संस्कृतीत रमण्याचा प्रयत्न केला. 


जॅकेटची किंमत


इवानकाच्या काळ्या जॅकेटची रचना अमेरिकन डिझायनर टोरी ब्रंचने केली होती, ज्याची किंमत ८३,५३२ रुपये ($ १२८९ ) होती.
 
ग्लोबल उद्योजक परिषदे दरम्यान इवाका परिधान केलेला पोशाख,२,२८,४६० रुपये किंमतीचा ( $  ३५५०) होता. तुर्की रुटसह कॅनेडियन डिझायनरने हा तयार केलेला आहे.



ग्लोबल उद्योजक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, हाय नेक, फुलांचा प्रिंट ड्रेस हा सलोनी नावाच्या डिझायनरने तयार केलेला आहे. त्याची किंमत ५१,१६२  ( $ ७९५ )आहे .


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फलकनुमा पॅलेसमध्ये रात्रीच्या जेवणाच्या वेळी जो पोशाख इवांकाने घातला होता त्याची किंमत 
२,२८,४६० रुपये  ($३५५० ) होती.