सोन्याची किंमत कालच्यापेक्षाही कमी, जाणून घ्या आजचे दर !
जाणून घ्या आजचा सोन्याचा दर
मुंबई : काल सोन्याच्या किंमतीत (today Gold Rate) घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. आज तर सोन्याचा दर कालच्यापेक्षाही कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे सोने खरेदी करण्याची इच्छा असणारे आजचा मुहूर्त देखील शोधू शकतात.
22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत काल 43,930 रुपये होती. आज ही किंमत कमी होऊन 43, 800 इतकी झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची कालची किंमत 44,920 रुपये इतकी होती. आज यामध्ये 120 रुपयांनी घट झालीय. आज हा दर 44, 800 वर येऊन पोहोचलाय.
चांदीच्या दरातही (Today Silver Rate) घट नोंदवण्यात आलीय. काल एक किलो चांदीचा दर 67,500 इतका होता. आज यामध्ये 900 रुपयांची घट नोंदवण्यात आलीय. हा दर आता 66,600 इतका झाला आहे.