मुंबई : सलग 18 दिवसानंतर आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमती वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर 12 पैशांवरून 15 पैसे केले आहेत. तर डिझेल 18 पैशांनी महागले आहे. यापूर्वी 15 एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलमधून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल अजूनही प्रति बॅरल 66 डॉलरच्या वर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्चे तेल कित्येक आठवड्यांपासून कमतरता दर्शवित आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर वरून कमी होऊन 63 डॉलर प्रति बॅरलवर गेली. पण आता ती वेगात परतत आहे.



पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आता थोडा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्याउलट किंमती वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात लोकांसाठी थोडा दिलासा मिळाला. 15 एप्रिलपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल 30 मार्च 2021 रोजी झाला. 


दिल्लीत पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोल. रुपयांवरून वाढून 96.83 रुपयांवरुन 96.95 रुपये झाले आहे. मुंबईत डिझेल 87.81 रुपयांवरून 87.98 रुपयांवर गेले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 90.62  रुपयांवरून वाढून 90.76 रुपयांवर विकले जात आहे.