काय आहे अग्निवीर योजना? संसदेत राहुल गांधींनी आक्षेप घेतल्यानंतर एवढा वाद का झाला?

Parliament Session 2024 : विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर अग्निवीर योजनेवरून लोकसभेत एकच गदारोळ झाला. 

Jul 01, 2024, 16:52 PM IST
1/7

राहुल गांधी संसदेत म्हणाले की, आपण नुकतेच अग्निवीर अजय सिंह यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. अजय सिंग यांनी जानेवारीत जम्मू-काश्मीरच्या राजौरीमधील भूसुरुंग स्फोटात बलिदान दिला. शहीद अजय सिंग यांच्या कुटुबांला योजनेतून एकही पैसा मिळाला नाही. तर ही लष्कराची नाही तर केंद्र सरकारची योजना अशी टीका त्यांनी संसदेत केली. 

2/7

राहुल गांधी यांच्या आरोपांचं राजनाथ सिंह यांनी खंडन करत. राहुल गांधी खोटे बोलून सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा पलटवार त्यांनी केला. 

3/7

तरदुसरीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत विरोधी पक्षनेत्याकडून चुकीची तथ्ये सभागृहात मांडली जात असा पटलवार केला.

4/7

 अग्निवीर योजनामुळे संसदेत गदारोळ झाल्यानंतर नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊयात. ही योजना जून 2022 मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेतर्गंत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यात येते. भारतीय लष्करातील सैनिकांप्रमाणे हे 'अग्निवीर' कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. 

5/7

ते फक्त चार वर्षे सेवा देतात आणि त्यानंतर अग्निवीर नागरी समाजात सामील होतात. या योजनेतर्गंत अग्निवीरांना 11.71 लाख रुपयांचे प्रमाणपत्र तसंच 'सेवा निधी' देण्यात येतो. 

6/7

कर्तव्यावर असताना अग्निवीरचा कोणताही अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत मिळते. अग्निवीरच्या मृत्यूनंतर उर्वरित चार वर्षांच्या सेवेचा पगारही दिला जातो, असं लष्कराकडून सांगण्यात आलंय. 

7/7

देशातील पहिला अग्निवीर गावते अक्षय लक्ष्मण याला सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना प्राण गमवावे लागले होते. महाराष्ट्राच्या या अग्निवीराला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि उर्वरित कर्तव्य कालावधीचे वेतन त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आले. याबद्दल लष्कराने सांगितलंय.