नवी दिल्ली : देशभरात आजपासून लग्नाचा सिझन सुरु झालाय. या दरम्यान ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) उताराचे संकेत आणि रुपया वधारल्याने (Gold rate today) आणि चांदीच्या किंमतीत (Silver rate today) मोठा उतार झालाय. यावेळी MCX वर सोन्याची किंमत ४८ हजार ७४० रुपये प्रति ग्रॅम आहे. १५५ रुपयांनी हा वाढीव भाव आहे. सकाळी सोनं ८८ रुपयांच्या उतारासह ४८ हजार ४९७ रुपये प्रति ग्रॅम (Gold price today) स्तरावर सुरु झालं. सुरुवातीला सोन्याने ४८ हजार ४१२ रुपये प्रति १० ग्रॅमचा न्यूनतम स्तर आणि ४८ हजार ५१६ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चतम स्तरावर पोहोचलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोरोना वॅक्सिन येण्याची शक्यता वाढल्याने आणि बायडेन यांनी अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभाग संभाळण्याची तयारी पाहता सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळेल असे एचडीएफसी सिक्योरीटीजचे ज्येष्ठ एनालिस्ट तपन पटेल यांनी म्हटलंय.


सोन्याची मागणी वाढली


HDFC सिक्योरीटीजनुसार मागच्या सत्रात सोन्याचा भाव ४९ हजार ६१८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. चांदी देखील १,५८८ रुपयांनी घसरुन ५९, ३०१ रुपये प्रति किलो ग्रॅमवर होती. गेल्या सत्रात ६०, ८८९ रुपये प्रति किलो ग्रॅमवर सत्र बंद झाले होते.


चांदी दरातही घसरण 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव नुकसानासहीत १८३० रुपये प्रति सरासरी राहीला. तर चांदीची किंमत २३.४२ डॉलर प्रति सरासरी साधारण बदलली नाही.


ज्वेलरीची विक्री जास्त


मोतीलाल ओस्वाल फायनांशि्ल सर्व्हीसेसच्या रिपोर्टनुसार, सोन्याचे दागिने (Gold Jewellery), (Gold rods) और नाणी (Gold Coins) यांची मागणी जास्त होतेय. 


दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा दर हा १०४९ रुपये कमी झालं आहे. चांदीच्या दरात १५८८ रुपये प्रति किलोग्रॅम कमी झाला आहे. तज्ञांच म्हणणं आहे की, कोरोना व्हॅक्सीन लवकरच येण्याची चिन्ह असल्यामुळे याचा दबाव वाढला आहे. 


तसेच या महिन्यात गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये १० लाख टक्क्यांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दर १०४९ रुपयांनी खाली आला असून आताचा दर ४८५६९ रुपये इतका आहे. या अगोदर दर ४९६१८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. 


दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर १५८८ रुपयांनी खाली उतरला असून आता ५९३०१ रुपयांवर थांबला आहे. चांदीचा दर या अगोदर ६०८८९ रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर हा १८३० डॉलर प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर हा २३.४२ डॉलर प्रति आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हॅक्सीनची आशा आणि बायडन यांचा व्हाइट हाऊसमधील प्रवेश यांचा प्रभाव सोन्याच्या दरावर झाला आहे. 


१ रुपयांत सोनं 


कोरोनाचं (COVID19) संकट ओढावल्यानं सोन्याच्या भाव (Gold Rate) सध्या गगनाला भिडलेयत. त्यात लग्नसराईचे दिवस जवळ आल्यानं सोनं खरेदीसाठी लोकं गर्दी करतायत. अशावेळी सोन्याच्या किंमती कमी असाव्यात ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण प्रत्यक्षात ते शक्य नसलं तरी  फोन पे (PhonePe) तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलंय. 


सध्याच्या काळात सोनं खरेदी देखील ऑनलाईन झालीय. कोणताही ग्राहक एक रुपयांपासून सोनं खरेदीची सुरुवात करु शकतो. फोन पेने यासंदरभात माहिती दिली. ३५ टक्के शेअर्ससोबत सोनं खरेदी करण्यासाठी भारतात सर्वात मोठा डिजीटल प्लॅटफॉर्म बनल्याचे फोन पेने सांगितले. यावर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सणांच्या दिवसांत त्यांच्या माध्यमातून झालेल्या सोने विक्रीत ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे देखील फोन पे ने म्हटलंय.