नवी दिल्ली : गुगलने ब्रिटीश लेखिका वर्जीनिया वुल्फ यांच्या १३६ व्या जन्मजदिनानिमित्त गुगल डुडल समर्पित केले आहे. त्या आपल्या लेखनासाठी जगप्रसिद्ध होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साहित्य जगतात महिलांचे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. 


त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक रचना या सुरू असलेल्या प्रसंगांवर आधारित आहेत. तर त्यांनी लिहिलेल्या अनेक कहाण्यांचे सुंदर असे सिनेमा आले आहेत.


विशेष अंदाज 


हे डुडल लंडन येथील इलस्ट्रेटर लुईस पॉमरॉय यांच्या इलस्टेशनवर आधारित आहे. यामध्ये वर्जीनिया आपल्या ओळखल्या जाणाऱ्या विशेष अंदाजात दिसत आहेत.


सुरूवातीचे आयुष्य


वर्जीनिया वुल्फ यांचा जन्म २५ जानेवारी १८८२ ला लंडन येथील केन्सिंगटनमध्ये झाला. एडेलीन वर्जीनिया स्टेफन हे त्यांचे नाव. साहित्यीक परिवारातच त्यांचे लहानपण गेले. म्हणून कमी वयातच त्या लिहायला लागल्या.