मुंबई : आपल्याला माहिती आहे की, जेव्हा आपण बँकेत पैसे जमा करतो तेव्हा आपल्याला त्यावर व्याज मिळते. आपण बचत खात्यात पैसे ठेवले असले तरी त्यावर देखील आपल्याला निश्चितच व्याज मिळतो. अशा परिस्थितीत आपली बँक आपल्याला किती व्याज देते हे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच, जर तुम्ही नवीन खाते उघडणार असाल, तर कोणती बँकेत अधिक व्याज देत आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सर्व लोकप्रिय बँकांच्या व्याज दराबद्दल माहिती देणार आहोत. त्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घेऊन आपले अकाउंट उघडू शकता.


सध्या या तीन प्रकारच्या बँकांमध्ये सर्वाधिक बचत खाती उघडली जात आहेत, ज्यात खाजगी बँका, सरकारी बँका आणि लघु वित्त बँकांचा समावेश आहे. तसे पाहाता सर्वात जास्त व्याज हा आपल्याला स्मॉल फायनॅन्समधून मिळतो. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने फार कमी लोकं त्यामध्ये आपले खाते उघडतात.


जर खाजगी बँकांबद्दल बोलायचे झाले तर, डीसीबी बँकेत 3ते 6.5 टक्के, आरबीएल बँकेत 4.25  ते 6.25 टक्के, बंधन 3 टक्के 6 टक्के, इंडसइंड बँकेत 4 टक्के ते 5.5 टक्के आणि येस बँकेत 4 टक्के ते 5.25 टक्के मिळत आहेत.


त्याचप्रमाणे सरकारी बॅकेतील पंजाब नॅशनल बँकेत 3 ते 3.5 टक्के, आयडीबीआय बँक 3 ते 3.4 टक्के, कॅनरा बँक 2.90 टक्के ते 3.20 टक्के, बँक ऑफ बडोदामध्ये 2.75 टक्के ते 3.20 टक्के आणि पंजाब अॅण्ड सिंध बँकेला 3.10 टक्के व्याज मिळत आहे.


सर्वाधिक व्याज देण्यास प्रसिद्ध असलेल्या स्मॉल फायनान्स बँकांविषयी बोलताना, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे 5 टक्के ते 7.25 टक्के, उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक 4 टक्के ते 7 टक्के, एयू स्मॉल फायनान्स बँक 3.5 टक्के ते 7 टक्के, इक्विटास स्मॉल फायनान्समध्ये 35. ते 7 टक्के इंटरेस्ट आहे. तसेच जन स्मॉल फायनान्स बँकेत 3 टक्के ते 6.75 टक्क्यांपर्यंत इंटरेस्ट दिले जात आहेत.