PayTM सोबत करू शकता Aadhaar डी-लिंक, पण होईल हे नुकसान
काय होईल नुकसान
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, नवीन सिम कार्ड खरेदी केल्यावर, बँक अकाऊंट ओपन केल्यावर आणि डिजिटल वॉलेट करता Aadhaar जरूरी नाही. PayTM चा आपण सर्रास वापर करतो. अनेक ठिकाणी पेटीएम स्विकारलं जातं. त्यामुळे खूप कमी लोकं असतील ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये पेटीएम नसेल.
पण PayTM वापर असाल तर KYC देखील केलं असेल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार KYC करता आधारकार्ड जरूरी नाही. पण जर तु्म्ही आधार डी-लिंक केलं तर घर बसल्या हे काम सहज करू शकता. पण यामुळे खूप मोठं नुकसान देखील होतं.
PayTM आधारशी कसे डी-लिंक करावे?
याकरता ग्राहकांना कस्टमर केअर (0120-2256456) या नंबरवर फोन करावा लागेल. ग्राहकांनी अधिकाऱ्यांना सांगावे की, आपल्याला आधारला डी-लिंक करायचे आहे. वेरिफिकेशननंतर तुम्हाला ईमेल पाठवला जाईल. तिथे पुन्हा एकदा आपल्या आधारला वेरीफाय करावे लागेल. आधारची कॉपी पाठवल्यानंतर 72 तासात आपले आधार डी-लिंक होईल.
आधार डी-लिंक होताच तुमचं पेटीएम वेरिफाइड राहणार नाही. अनवेरिफाइड अकाऊंटमधून कोणतंही ट्रांसेझन केलं जात नाही. यानंतर तुम्ही दुसऱ्या आयडीवरून म्हणजे वोटर आयडी, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्समधून पुन्हा एकदा KYC करू शकता.