मुंबई : तुम्ही तुमच्यकडे असलेल्या 10-20-50 किंवा अगदी 1000 ते 2000 च्या नोटांचं कधी निरीक्षण केलं आहे का? वास्तविक, भारतीय चलनाशी संबंधित माहितीचे स्वतःचे एक मनोरंजक जग आहे. या नोटांबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सामान्य वाटतात, परंतु तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नसेल, तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय चलनात किती भाषा छापल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच मुख्य भाषा हिंदी आणि इंग्रजी व्यकिरिक्त ते नोट वर किती भाषांमध्ये नोटीचं मुल्य लिहिलेले असते? तुमच्या पर्समधून फक्त 100 रुपयांची नोट काढा, तिला मागे पलटा. तेथे तुम्हाला पांढऱ्या भागाला लागून असलेल्या एका पट्टीमध्ये 15 भाषांमध्ये 100 रुपये लिहिलेले दिसेल.


नवीन नोटवर छापीलेले चित्र आणि त्याच्या आकृत्या कोण ठरवते? आरबीआयच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमाच्या कलम 25 नुसार, आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशी विचारात घेतल्यानंतर नोटांचे डिझाईन, फॉर्म आणि साहित्य केंद्र सरकार ठरवते असे सांगण्यात आले आहे.


तुम्ही नोटवर “मैं धारक को ... रुपये अदा करने का वचन देता हूं” असे लिहिलेले पाहिले असेल, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, असे का लिहिलेले असते? वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या कलम 26 नुसार, बँक नोटांचे मूल्य देण्यास जबाबदार आहे. वरील वाक्य RBI कडून हमी आहे की, 100 रुपयांच्या नोटसाठी धारकावर 100 रुपयांचे दायित्व आहे. हे एक प्रकारे RBI चे नोटांच्या मूल्याबाबतचे वचन आहे.