कानपुर : कुख्यात गुंड विकास दुबे आज सकाळी ७.१५ ते ७.३५ च्या दरम्यान उत्तर प्रदेशची एसटीएफ टीमसोबत झालेल्या झटापटीत मारला गेला. विकास दुबेने पोलिसांची बंदुक घेण्याच्या प्रयत्न केला. या झटापटीत एका गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामध्ये तो मारला गेला. काहीजणांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर हा एक बनाव आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री साडे अकराच्या सुमारास विकास दुबे याला घेऊन पोलिस कानपूरला निघाले होते. या प्रवासा दरम्यान नेमकं काय काय झालं? विकास दुबे एन्काऊंटमध्ये कसा मारला गेला? याचा घटनाक्रम... (८ पोलीस हत्याकांडातील आरोपी गुंड विकास दुबेचा पोलिसाशी झालेल्या चकमकीत खात्मा)



उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे याला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आलं. कानपूरच्या बिकरू गावांत २ जुलै रोजी आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. विकास दुबेवर ५ लाखांच बक्षिस ठेवण्यात आलं होतं. मात्र ९ जुलै रोजी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 



पोलिसांकडून एन्काऊंटरनंतर सांगण्यात आलं की, ५ लाख बक्षिस असलेल्या विकास दुबेला उज्जैनमधून ताब्यात घेण्यात आलं. पोलीस आणि एसटीएफची टीम १० जुलै रोजी दुबेला घेऊन कानपूरला निघाली होती. कानपुर नगरच्या पोलिसांमध्ये आणि दुबेमध्ये झटापट झाली. यामध्ये गाडीचा अपघात झाला. दुबे पळून जाताना एन्काऊंटरमध्ये मारला गेला. 



कानपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पळून जाणाऱ्या विकास दुबेला आत्मसमर्पणाचा सल्ला दिला. पण त्याने ते ऐकलं नाही. त्यावेळी एन्काऊंटरदरम्यान विकास दुबे जखमी झाला. 



त्याला उपचारा करता रूग्णालयात नेण्यात आलं. उपचारा दरम्यान विकास दुबेचा मृत्यू झाला. कानपूर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र याबाबत पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत.