मुंबई : जेव्हाही मे महिना येतो तेव्हा लोकांना कारगिल युद्धाची आठवण येते. लोकं या युद्धा बद्दल चर्चा करत असतात.  मे 1999 मध्ये उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरच्या कारगिल सेक्टरमध्ये (आता लडाख) भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये युद्ध पेटले. या युद्धात भारताला पहिला विजय 30 मे 1999 रोजी मिळाला आणि या विजयाचे श्रेय कर्नल सोनम वांगचुक यांना जाते. यामुळेच कर्नल वांगचुक यांना 'लायन ऑफ लडाख' म्हणून ओळखले जाते.


कर्नल वांगचुक यांच्या शौर्याचे आजही कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नल (सेवानिवृत्त) सोनम वांगचुक हे लडाख स्काऊट्सचे हिरो आहेत. कार्गिल युद्धात कर्नल वांगचुक यांनी चोरबटला येथे भारतीय सैन्याच्या चौकीवरून 135 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. कर्नल वांगचुक ज्या लडाख स्काऊट्सशी संबंधित होते, त्या बटालियनची जबाबदारी ही कठीण परिस्थितीत देशाच्या सीमेचे रक्षण करण्याची आहे.


खरेतर युद्धाच्या वेळी कर्नल वांगचुक सुट्टीवर होते. पण युद्धाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचताच ते आपल्या कर्तव्यावर तत्पर झाले. त्यांनी आपली सुट्टी मध्यावरच सोडली आणि बेस कॅम्पला पोहोचली. कर्नल वांगचुक यांना त्यांच्या या युद्धातील धाडसाबद्दल महावीर चक्र देण्यात आले.


पाकिस्तानी सैनिकांनी बटालियनला घेराव घातला


कारगिल युद्धामध्ये कर्नल वांगचुक यांच्या सहकारी सैनिकांना पाकिस्तानी सैनिकांनी वेढा घातला होता. कर्नल वांगचुक यांनी निश्चय केला की, काही ही होऊ दे परंतु  कोणत्याही परिस्थितील आपल्या सहकारी सैनिकांचे प्राण वाचावायचेच. त्यामुळे आपल्या जीवाची पर्वा न करता ते आपल्या सहकारी सैनिकांना वाचवण्यासाठी गेले.


या लढाईच्या विजयानंतर जेव्हा त्यांना विचारले गेले की, यात तुम्ही आपला जीव गमावू शकला असतात?, त्यावर कर्नल वांगचुक यांनी उत्तर दिले, ''अधिकाऱ्यांना पुढे येऊन नेतृत्व करावे लागेल आणि त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.''


कर्नल वांगचुककडे 40 सैनिक होते आणि पाकिस्तानी घुसखोरांची संख्या 135 होती. कर्नल वांगचुक आणि त्याचे सहकारी सैनिक यांनी 18 हजार फूट उंचीवरुन 6 डिग्री तापमानात पाकिस्तानी सैनिकांचा सामना केला.


कर्नल वांगचुक आणि त्यांच्या सैनिकांनी पाक सैनिकांशी तीन दिवस दोन फूट गोठलेल्या बर्फात लढाई केली. कर्नल वांगचुक यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानी घुसखोरांना कोणत्याही प्रकारे सीमा पार करु द्यायची नव्हती.या एकाच निश्चयाने ते इतक्या थंडीत तेथे तग धरुन बसु शकले.


चोरबटला  हे लडाखमधील महत्त्वाचे आणि पाकिस्थानच्या जवळचे ठिकाण आहे. कर्नल वांगचुक आणि त्याचे सहकारी सैनिक यांना जर यावर ठिकाणावर विजय मिळावता आला नसता, तर कोणीही पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय जमीनीला ताब्यात घेण्यापासून रोखू शकले नसते. जर पाकिस्तानचे सैनिक इथे आले असते तर त्यांनी लेह-खलसी रस्ता ताब्यात घेतला असता.


हा रस्ता युद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि सैनिकांच्या कामांसाठी वापरला जात होता. याशिवाय लेह-श्रीनगरकडे जाणारा हा रस्ता आहे. त्यामुळे ही लढाई जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे होते.