मुंबई : सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फोटो खरे आहेत की नाहीत याबाबत कोणतीच माहिती समोर अद्याप आलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. आरबीआयने नुकतीच 200 आणि 10 रुपयांची नोट जाहीर केली आहे.  या अगोदर भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000, 500, 200 आणि 50 रुपयांची नोट जाहीर केली आहे. 


कोणतीची सूचना नाही 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे नोट जरी खरे वाटत असले तरीही आरबीआयने या नोट छापलेल्या नाहीत. 1000, 350 चे नोट अद्याप सादर केलेले नाहीत. तसेच आरबीआयची कोणतीही पूर्ववत सूचना देखील नाही. 



5 रुपयांच्या नोटांच सत्य 


5 रुपयांची नोट ही पूर्णपणे खोटी आहे. 5 रुपयाची नोट जी व्हायरल होत आहे ती 50 रुपयांची नोट आहे. आरबीआयने नुकतीच 50 रुपयांची नवी नोट सादर केली होती. फोटोत या नोटवर पन्नास रुपये दिसत आहे मात्र अंकात ते फक्त 5 रुपये दाखवण्यात आले आहेत. ज्यामध्ये 5 हा अंक देखील अगदी स्पष्ट दिसत नाही. 



20 रुपयाची नोट देखील खोटी 


आतापर्यंत 20 रुपयाची नोट आपण गुलाबी रंगात पाहिली आहे. पण व्हायरल होणारी ही 20 रुपयाची नोट हिरव्या रंगाची आहे. यामध्ये पूर्णपणे फोटोशॉप केल्याचं दिसत आहे. 2000 रुपयांच्या नोटांचा रंग जसा बदलत आहे तसाच 20 रुपयाच्या नोटांचा रंग देखील बदलला आहे. 



1000 नोट खरी आहे की खोटी 


5 रुपयाच्या नोटांप्रमाणेच 1000 रुपयांची नोट देखील खोटी असल्याच सांगितलं जात आहे. फोटो पाहताच ही नोट खोटी असल्याचं स्पष्ट होतं. मात्र नोट आणखी थोडी नीट पाहिली की सत्य समोर येतं.