मुंबई : पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) भारताच्या प्रत्येक कुटुंबात एलपीजी गॅस कनेक्शन जोडण्यात येत आहे. महानगरांमध्ये पीएनजीचा (पाइपलाइन गॅस) वापर होत आहे. परंतु अनेक स्वयंपाक घरांमध्ये गॅस सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंपाक घरांत दररोज गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. पण सिलेंडरबाबत काही गोष्टी अनेकांना माहित नसतात. ज्याप्रमाणे खाण्या-पिण्याच्या वस्तूंवर, औषधांवर एक्सपायरी डेट असते, त्याप्रमाणे गॅस सिलेंडरलाही एक्सपायरी डेट  (Gas Cylinder Expiry Date) असते. एक्सपायरी डेट संपल्यानंतर गॅस सिलेंडर धोकादायक ठरु शकतो. 


ज्यावेळी ऐजन्सी किंवा डिलिव्हरीमॅनकडून गॅस सिलेंडर घेतला जातो, त्यावेळी त्यावर दिलेली एक्सपायरी तारीख तपासणं आवश्यक आहे. एक्सपायरी डेटनंतर सिलेंडरवर लावण्यात आलेल्या सीलची पकड कमकुवत होऊ लागते. त्यामुळे गॅस सिलेंडर लीक होऊन सिलेंडर फुटण्याचा धोका निर्माण होतो. एक्सपायरी गेलेल्या सिलेंडरची तेल कंपन्या तपासणी करतात. तपासणीनंतर सिलेंडरवर पुन्हा नवीन तारीख टाकली जाते.


एक्सपायरी तारीख (Expiry Date) एका कोडमध्ये असते. या कोडमध्ये सिलेंडर एक्सपायर होण्याचा महिना आणि वर्ष लिहिलेलं असतं. गॅस कंपन्या संपूर्ण वर्षाची चार भागात विभागणी करतात. जानेवारी-फेब्रुवारी-मार्चपर्यंत (A), एप्रिल-मे-जून (B), जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर (C), ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर (D) असे कोड देण्यात आले आहेत.


उदा. गॅस सिलेंडरवर B. 25 असा कोड देण्यात आला आहे. म्हणजेच तो सिलेंडर बी (B) म्हणजे एप्रिल-मे-जून २०२५ला एक्सपायर होईल. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेची जबाबदारी तेल कंपन्यांची नसते. 


सिलेंडर घेताना त्याची संपूर्ण तपासणी करा. काही वेळेला सिलेंडर लीक होऊ शकतात. त्यामुळे सिलेंडरला ज्याठिकाणी सील लावण्यात आलं आहे, त्याठिकाणी सील काढून सिलेंडरची तपासणी करुन घ्या. 


  


जर गॅस सिलेंडर स्वत: जाऊन आणला तर, सिलेंडरच्या किंमतीतून डिलिव्हरी चार्ज कमी करता येऊ शकतो. गॅस एजन्सी घरी सिलेंडर पोहचवण्यासाठी डिलिव्हरी चार्ज आकारते. तो चार्ज गॅस सिलेंडरच्या किंमतीत जोडलेला असतो. सध्या डिलिव्हरी चार्ज १९.५० रुपये इतका आहे. 


गॅस सिलेंडरसंबंधी कोणतीही तक्रार असल्यास १८००२३३३५५५ या क्रमांकावर त्याची नोंद करता येऊ शकते.