Who Is Lalit Modi : कोण आहे हा ललित मोदी, ज्याच्या प्रेमात सुष्मिता दिवानी?
Who Is Lalit Modi : आयपीएल माजी चेयरमन (Former ipl chairman) ललित मोदी आणि मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या रिलेशनशिपबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये वर्तुळात एकेकाळी सर्वांच्या ओठावर असणारं नावं म्हणजे ललित मोदी. आयपीएल माजी चेयरमन ललित मोदी आणि मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगलीय. आम्ही दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं मोदीने ट्वीटद्वारे सांगितलं. त्यानंतर कुठेच चर्चेत नसलेला ललित तडकाफडकी ट्रेंड होऊ लागला. नक्की कोण आहे ललित मोदी हे आपण जाणून घेऊयात. (know who is lalit modi who dating to miss universe and bollywood actress sushmita sen ipl controversy cricket)
- दिल्लीत 1963 मध्ये जन्मलेल्या ललित मोदीने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे पहिले अध्यक्ष असण्याचा मान मिळवला होता.
- मोदीने अमेरिकेत अभियांत्रिकी आणि व्यवसाय प्रशासनाचं शिक्षण घेतलं. तसेचअमेरिकेतील क्रीडा व्यवसायातून प्रेरणा घेऊन मोदीनी भारतात क्रिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
- ललितने 1995 मध्ये 50 ओव्हर एकदिवसीय देशांतर्गत लीगची संकल्पना मांडली होती. तसेच त्याने ही संकल्पना इंडियन क्रिकेट लीग लिमिटेड नावाने प्रस्तावित केला होता. पण बीसीसीआयने या कल्पनेला फारसा भाव दिला नाही.
- मोदीचे भाजप आणि काँग्रेससोबत (INC) चांगले संबंध होते. या संबंधांच्या आधारावर मोदीने भारतीय राजकारणातही आपला दबदला निर्माण केला. मोदीने 2005 मध्ये राजस्थानच्या त्तकालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोदीची नियुक्ती केली.
-क्रिकेटमध्ये टी 20 फॉर्मेटची चलती आहे. भारतात आयपीएल टी 20 लीग आणण्यात मोदीचं मोठं योगदान आहे. भारतात 2009 मध्ये लोकसभा निवडणुका लागल्या होत्या. त्याच वेळेस आयपीएलचा दुसरा हंगामही तोंडावर होता.
-त्यामुळे आयपीएलसाठी सुरक्षा पुरवण्यात सुरक्षा यंत्रणांनी नकार दिला होता. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या हंगमाचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं. तेव्हा मोदीनी परदेशातही स्पर्धेचं आयोजन करुन ते यशस्वी कसं करता येतं सोबतच आर्थिक फायदा कसा मिळवता येतो, याचा उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवलं.
- आयपीएल 2010 अंतिम सामन्यानंतर पुणे आणि कोच्ची या दोन्ही संघासंबंधात मोदीवर असभ्य वर्तन, आर्थिक हेराफेरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांना बीसीसीआयमधून आऊट करण्यात आलं. बीसीसीआयने या सर्व प्रकरणात मोदीची चौकशी लावली. या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीने मोदीला आरोपी ठरवलं. समितीच्या या निर्णयानंतर अखेर मोदीवर आजीवन बंदी घालण्यात आली.
-समितीच्या या निर्णायामुळे आता मोदीचं कारकिर्दीला ब्रेक लागला. मोदी तेव्हापासून लंडनमध्ये स्थिरावला. मात्र अचानक मोदीने गुरुवारी (14 जुलै) सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले. मोदीने ट्विटमध्ये सुष्मिताचा 'बेटर हाफ' असा उल्लेख केला. त्यामुळे या दोघांनी लग्न केल्याचा समज नेटकऱ्यांचा झाला. या दोघांनी लगीनगाठ बांधली असल्याच्या चर्चेला उधाण आलं.
-मात्र आपल्या दोघांबाबत गैरसमज पसरल्याचं मोदीला लक्षात आलं. पुढच्या क्षणी मोदीने दुसरं ट्विट केलं. यामधून त्याने आम्ही अद्याप लग्न केलं नसून प्रेमसंबंधात असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता हे दोघे केव्हा सप्तपदी घेणार, याकडे सर्वाचंच लक्ष असणार आहे.