पेट्रोल पंपवर मिळणाऱ्या `या` सुविधा आणि अधिकारांबाबत तुम्हाला माहितेय का?
पेट्रोल पंपावर (Petrol Pump) फसवणूक झाल्याची तक्रार अनेक जण करतात.
मुंबई : पेट्रोल पंपवर (Petrol Pump) अनेकांसोबत मापात पाप केल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पेट्रोल पंपबाबत अनेकांच्या विविध तक्रारी असतात. पेट्रोल पंपवरील इंधनात (Fuel) भेसळीचे आरोपही केले जातात. मात्र ही अशी फसवणूक होऊ नये म्हणून सर्वसामांन्यांना आपले अधिकार माहिती असणं गरजेचं आहे. पेट्रोल पंपवर इंधन भरत असाल, तर पंपचालकाला नियमांनुसार ठराविक सुविधा देणं बंधनकारक असतं. तसंच इंधन भरणाऱ्यांचे काही अधिकार असतात. नक्की काय सुविधा मिळतात आणि अधिकार काय असतात, हे आपण जाणून घेऊयात. (know your rights and facility on petrol pump and be alert)
- इंधन भरणाऱ्यांना पेट्रोल पंपवरील पेट्रोल आणि डिझेलची गुणवत्ता जाणून घेण्याचा अधिकार आहे. इंधनात भेसळ तर केली नाही ना, हे जाणून घेण्यासाठी पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक किंवा कर्मचारी यांच्याकडे फिल्टर पेपर मागू शकता.
- योग्य प्रमाणात पेट्रोल किंवा डिझेल दिलं जातंय की नाही, हे तपासण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपाने पेट्रोल किंवा डिझेलचे प्रमाण मोजण्यासाठी 5 लिटर जार ठेवावे.
-पेट्रोल किंवा डिझेलच्या खरेदीसाठी कॅश मेमो मागण्याचा अधिकार आहे. पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडून याची मागणी करू शकता.
-पेट्रोल किंवा डिझेलची घनता जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हे पेट्रोल वेंडिंग मशीनवरही लिहिलेलं असतं.
-पेट्रोल पंपवर काही सुविधा मोफत देणं बंधनकारक असतं. यामध्ये हवा मोफत (Tyre Pressure Air) देणं अपेक्षित आहे. तसेच फर्स्ट एड बॉक्स ठेवणंही गरजेचं आहे.