मुंबई : फिल्म इंडस्ट्रीतील स्टार किंवा स्टार किड्सची नावे ड्रग्जशी जोडली जाण्याची ही तशी ही पहिलीच वेळ नाही. हे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे आणि अनेक स्टार्सची नावे ड्रग्जशी जोडली गेली आहेत. अगदी काही स्टार्सना यासाठी तुरुंगात देखील जावे लागले आहे. यावेळी बॉलिवूडचा बादशाह किंवा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मुलामुळे, ड्रग्स इत्यादींची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. यावेळी तपास चालू आहे, परंतु औषधांच्या संदर्भात सामान्य लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे ड्रग्जशी घेणे बेकायदेशीर आहे की नाही हे जाणून घेणे मनोरंजक आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती ड्रग्जसह आढळते, तेव्हा त्यांच्या विरोधात काय काय कारवाई केली जाते हे तुम्हाला माहित आहे? 


नशा करणे हे बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ड्रग्जशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची माहिती मिळेल.


नशा करणे गुन्हा आहे का?


सार्वजनिकरित्या नशा करणे हा गुन्हा मानला जात असला, तरी काही नशा या खाजगी मालमत्तेमध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्याची विक्री देखील सार्वजनिकरित्या केली जात आहेत. परंतु काही मादक पदार्थांविषयी वेगवेगळे नियम आहेत आणि ते विकणे, बाळगणे आणि वापरणे देखील बेकायदेशीर मानले जाते.


या प्रकरणांबाबत एक कायदा देखील आहे, ज्याला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act.)  म्हणतात. हा कायदा 14 नोव्हेंबर 1985 रोजी 1940 च्या औषध आणि सौंदर्य प्रसाधने (Drugs and Cosmetics Act ) कायद्याच्या जागी तयार करण्यात आला. त्यानंतर त्यात 1989, 2001, 2014 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.


औषधांबाबत काय नियम आहेत?


NDPS कायद्याअंतर्गत मादक पदार्थांची निर्मिती, मालकी, विक्री, खरेदी, व्यापार, आयात किंवा निर्यात आणि वापर करणे हा गुन्हा आहे. परंतुना वैद्यकीय सायन्स आणि रिसर्चसाठी ड्राग्स वापरासाठी सूट देण्यात आली आहे. 


परंतु  ड्राग्सचा प्रकार आणि त्याचे प्रमाण यावर त्याची शिक्षा अवलंबून असते. नारकोटिक्स ड्रग्समध्ये गांजा (Cannabis), कोका (Coca) आणि अफूचा (Opium) समावेश करण्यात आला आहे.


गांजामध्ये (Cannabis) चरस, हषीश, गांजा इतर प्लांट ड्रग्स, कोका प्लांट, लीफ, कोकेन इत्यादींचा समावेश आहे. तसेच अफूमध्ये पॉपी प्लांट, पॉपी स्ट्रॉ, हेरोइन, मॉर्फिन (morphine), कोडीन (codeine) , थेबेन (thebaine) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर 2014 मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये इतर अनेक प्रकारच्या इतर औषधांचाही समावेश करण्यात आला आहे.


कोणाचे प्रमाण किती?


प्रत्येक प्रकारच्या अमली पदार्थाच्या आधारावर हे ठरवले जाते की, कोणाला किती शिक्षा होते. यात दोन कॅटेगरी आहेत आणि एक स्मॉल कॅटेगरी आहे आणि दुसऱ्या कॅटेगरी जास्त माल असलेले लोकं आहे. त्याची शिक्षा सुद्धा खूप जास्त आहे.


उदाहरणार्थ, हेरोइनची स्मॉल कॅटेगरी 5 ग्रॅम आहे आणि 250 ग्रॅम ही बिग कॅटेगरी आहे. यामध्ये शिक्षेची तरतूद देखील वेगळी आहे. त्यामुळे व्यक्तीजवळ किती ड्रग्स मिळेल यावर त्याची शिक्षा दिली जाते.


त्याच वेळी, अफूचे कमीत कमी प्रमाण 25 ग्रॅम आणि दुसऱ्या मोठ्या कॅटेगरीमध्ये 2.5 किलो आहे. तर गांजामध्ये 1000 ग्रॅम स्मॉल आणि 20 किलो बिग कॅटेगरी असते. तर चरस, कोका लीफ, कोकेन, मेथाडोन, टीएचसी, एलएसडी इत्यादींसाठी प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे देखील व्यक्तीला शिक्षा वेगवेगळी आहे.