प्रत्येक व्यक्तीचे Fingerprints वेगळे का असतात, हात भाजल्यावर ते बदलतात का?
परंतु बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की, जर मझ्या हाताला भाजलं किंवा काही दुखापत झाली तर माझ्या हाताचे फिंगरप्रिंट बदलतील का?
मुंबई : प्रत्येक मानवी हाताची त्वचा दोन थरांनी बनलेली असते. पहिला थर एपिडर्मिस आणि दुसरा थर डर्मिस आहे. दोन्ही थर एकत्र वाढतात. या दोन थरांच्या मिश्रणाने हातांच्या त्वचेवर बोटांचे ठसे तयार होतात. फिंगरप्रिंट फुगवटा इतके शक्तिशाली असतात की ते पासवर्डप्रमाणे वापरले जातात आणि नेहमीच्या आयुष्यात देखील आपण याचा वापर करतो. जसे की आपला फोन अनलॉक करण्यासाठी आपण फिंगरप्रिंटचा वापर करतो. परंतु बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की, जर मझ्या हाताला भाजलं किंवा काही दुखापत झाली तर माझ्या हाताचे फिंगरप्रिंट बदलतील का? तर तुम्हाला आम्ही यामागील माहिती सांगणार आहोत.
हे लक्षात घ्या की, हात भाजला तरी फिंगरप्रिंट बदलत नाहीत. जखम झाल्यावरही हाताचा ठसा तसाच राहतो.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात एवढी मोठी लोकसंख्या आहे, परंतु कोणत्याही मनुष्याच्या बोटाचे ठसे इतर कोणत्याही मनुष्याशी जुळत नाहीत. माणसाचे फिंगरप्रिंट एकदा तयार झाले तरी आयुष्यभर तेच फिंगरप्रिंट राहतात. हे इतके अनोखे आहे की, ते दुसर्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटशी कधीही जुळत नाही. यामागे मानवी जीन्स, पर्यावरण यांसारखे घटक जबाबदार आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मूल आईच्या गर्भाशयात वाढत असते, त्या काळात त्याच्या बोटांचे ठसे तयार होऊ लागतात. दुसरीकडे, जर हातांमध्ये काही समस्या असेल आणि बोटांचे ठसे गायब झाले तर काही महिन्यांत ते पुन्हा त्याच स्थितीत येतात. हात जळल्यानंतर महिन्याभरात बोटांचे ठसे आहेत तसेच पुन्हा येतात.
वयानुसार व्यक्तीच्या फिंगरप्रिंटमध्ये बदल होतो का?
हे लक्षात घ्या की वयानुसार व्यक्तीच्या फिंगरप्रिंटमध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र, तरुण वयात बोटांच्या ठशांमध्ये नक्कीच लवचिकता येते आणि जसजसे वय वाढते. ही लवचिकता संपते आणि बोटं कडक होतात, परंतु आयुष्यभर मानवी बोटांच्या ठशाच्या संरचनेत कोणताही बदल होत नाही.