मुंबई : मानवी शरीरात अनेक अभिक्रिया घडत असतात. मनुष्य जागी असो की झोपलेला.  त्याच्या शरीराचे अवयव यंत्रांसारखे काम करीत असतात. मनुष्याचे शरीर अनेक चमत्कारीक गोष्टींनी भरले आहे. अनेकदा आपल्याला माहित नसते की, आपल्या शरीरात किती ऊर्जा भरली आहे ते! बहुदा तुम्हाला माहित नसेल की, मनुष्याच्या शरीरात अशी खास बाब असते की, ज्यामुळे ते धारदार रेजर ब्लेड(Razor Blade)सुद्धा पचवू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे डिजॉल्व होऊ शकते ब्लेड 
व्यक्तीच्या शरीरात ऍसिड बनत असते. हे आपल्याला माहितीच आहे. एसिडला 1 ते 14 पर्यंतच्या पीएम लेवलवर मोजले जाते. याबाबतीत पीएच स्तर जेवढा कमी असेल, ऍसिड तेवढे मजबूत असते. 


मनुष्याच्या पोटात आढळणारे ऍसिड  साधारण 1.0 ते 2.0 असते. याचा अर्थ पीएच लेवल खुप जास्त असते. आरडी.कॉमच्या रिपोर्टनुसार गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी पत्रिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडी रिपोर्टमध्ये वैज्ञानिकांनी पोटामध्ये आढळणारे ऍसिड एका धारदार ब्लेडला सहजपणे डिजॉल्व करता करू शकते. असा दावा केला आहे. 


विरघळण्यास लागतात 2 तास
रिपोर्टच्या मते, पोटात असणारे ऍसिड इतके स्ट्रॉंग असते की, हे एका रेजर ब्लेडला देखील 2 तासांत विरघळू शकते. आणि व्यक्तीच्या शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. 


परंतु हे जाणून घेणे गरजेचे आहे की, तोंडापासून पोटापर्यंत जाण्याच्या रस्त्यात ब्लेड शरीराची एवढी इजा करू शकते की, त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही असा प्रयोग चुकूनही करू नका असे तज्ज्ञांचे आवाहन आहे.