Knowledge: गॅस सिलेंडरखाली का असतात अशी छिद्र? 99 टक्के Scholar ही उत्तर देण्यात अपयशी
ही माहिती असणं तुमच्याच फायद्याचं
LPG Cylinder Facts: दररोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी घराघरांमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) अर्थात एलपीजीचा वापर केला जातो. LPG एका लोखंडी सिलेंडरमध्ये साठवला जातो. घरी येणारा सिलेंडर आपल्यासाठी नवा नाही, पण कधी त्या सिलेंडरला निरखून पाहिलंय तुम्ही? (Knowledge news LPG Cylinder gas hole interesting Facts)
या सिलेंडरच्या अगदी खालच्या भागात एल लोखंडी रिंग असते ज्यावर त्याचा संपूर्ण भार असतो. याच रिंगवर काही छिद्रही असतात. पण, का बरं असतील तिथे ती छिद्र? हा काही कलाकुसरीसाठी केलेला भाग नाही. तर त्यामागेही काही शास्त्रीय कारणं आहेत.
सिलेंडरखाली असणारी ही छिद्र अतिशय महत्त्वाची असतात. त्यामध्ये असणाऱ्या एलपीजीचं तापमान नियंत्रणात आणण्यासाठी छिद्रांचा वापर केला जातो. अनेकदा सिलेंडरचं तापमान वाढण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीमध्ये याच छिद्रांमधून हवा बाहेर पडते परिणामी तापमान अगदी सहजपणे नियंत्रणात येतं.
कोणत्याही पृष्ठाच्या उष्णतेपासूनही सिलेंडरचा बचाव होतो. थोडक्यात अपघात टाळण्यासाठी ही लहानशी छिद्र मोठ्या फायद्याची ठरतात.
असं म्हणतात की, घरात सिलेंडर असणं म्हणजे सोबत एक जिवंत बॉम्ब बाळगणं. कारण, अनावधानानं जराशीही चूक झाल्यास स्वयंपाकासाठी वापरला जाणारा हाच सिलेंडर जीवावरही बेतू शकतो. त्यामुळं त्यासंदर्भातील बारीकसारीक माहिती ठेवणं कधीही फायद्याचं.