Colours of Milestones: महामार्गावरून गाडी चालवताना ठिकणाठिकाणी सूचना देणारे फलक आणि माईलस्टोन दिसतात. सूचना फलक आणि माईलस्टोनवरून माहिती मिळते. मैलाचे दगड लावण्याची पद्धत आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर ते ठिकाण किती लांब आहे, याचा घेतला जातो. प्रवासादरम्यान माईलस्टोन प्रवाशांना खूप मदत करतात. या दगडांवर लिहिलेले अंतर पाहूनच प्रवासी प्रवासाला निघतात. पण महामार्गावर असलेल्या विविध रंगाच्या माईलस्टोनचा एक अर्थ असतो. जर तुम्हाला रंगाचा अर्थ माहिती नसेल तर जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिवळा माइलस्टोन- तुमच्या प्रवासादरम्यान पिवळ्या रंगाचा मैलाचा दगड आला तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून जात आहात. महामार्ग एका राज्याला इतर राज्यांशी आणि शहरांना जोडतात. राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती आणि देखभाल केंद्र सरकारच्या जबाबदारीत येते.


हिरवा माईलस्टोन- प्रवासादरम्यान हिरवा मैलाचा दगड दिसला तर समजून घ्या की तुम्ही राष्ट्रीय महामार्ग सोडून त्या वेळी राज्य महामार्गावर पोहोचला आहात. भारतात, राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामार्गांना हिरवे माईलस्टोन आहेत. हे टप्पे बांधण्यापासून ते निगा राखण्यापर्यंतची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे.


नारंगी माईलस्टोन- प्रवासादरम्यान तुम्हाला नारंगी रंगाचे माईलस्टोन दिसले तर समजून की तुम्ही गावातून जात आहात. हे रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधले जातात. जवाहर रोजगार योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून गावागावात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर ऑरेंज रंगाचा वापर केला जातो.


Army Tank आहे की SUV! गाडी पाहून तुम्हीही व्हाल खूश, किंमत फक्त...


इतर रंगाचे माईलस्टोन- पिवळा, हिरवा आणि नारंगी रंगांव्यतिरिक्त, तुम्हाला काळा, पांढरा आणि निळा रंगाचे माइलस्टोन दिसतील. अशा स्थितीत, कुठेतरी प्रवास करताना या रंगांचे माईलस्टोन दिसले की समजा तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या रस्त्यांच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी तेथील महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाची आहे.