मुंबई : आपण लोकांना बऱ्याचदा बोलताना ऐकलं असेल की, तो व्यक्ती करोडपती किंवा लखपती आहे. त्याच्याकडे खूप पैसे आहेत. वैगरे-वैगरे... तसेच आपण आणखी एका शब्दाचा उल्लेख करतो, तो म्हणजे राष्ट्रपती. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, या अशा शब्दांसमोर पती का लावलं जात आहे? त्याचा नेमका संबंध काय? किंवा हे कधीपासून सुरु झालं? तुम्हाला जरी याचा अर्थ माहित नसला तरी काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला, पती हा शब्द का वापरला जातो हे जाणून घेण्यात मदत करणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु त्या पूर्वी आपण राष्ट्रपती या शब्दासंदर्भात सुरु असलेल्या एका वादा विषयी जाणून घेऊ या. ज्यामुळे तुम्हाला हे समजुन घेणं जास्त सोपं होईल.


काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी 'राष्ट्रपती' ऐवजी 'राष्ट्रपत्नी' हा शब्द वापरला होता. आता या शब्दावरुन विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. अधीर रंजन यांनी राष्ट्रपतींवर केलेल्या टिप्पणीवर खुलासा सादर केला आहे. त्यांनी आपली चूक मान्य केली आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अधीर रंजन चौधरी यांना या विषयावर लोकसभेत आपली भूमिका मांडून माफी मागण्यास सांगितले गेले आहे.


त्यांच्या या विधानामुळे भाजप संसदेपासून ते मीडिया आणि सोशल मीडियापर्यंत सर्वत्र काँग्रेसवर हल्लाबोल होत आहे.


चला आता आपण पती या शब्दाचा अर्थ समजून घेऊ


आम्ही तुम्हाला सांगतो की पती या शब्दाचा अर्थ काय आहे, स्वामी किंवा मालक. तसेच अनेक पैराणिक कथांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये प्रजा-पति, भूपती, असे शब्द आपण एकले तसेच, वाचले आहे. ज्याचा प्रत्यक मालक म्हणून होतो. त्यामुळे ज्या व्यक्तींकडे जास्त पैसे असले की, त्याला पैशांचा मालक म्हणून करोडपती किंवा लखपती असा उल्लेख केला जातो.


अनेक इंडो-इराणी भाषांमध्ये पती या शब्दाचा वापर 'स्वामी' किंवा 'मालिकसाठी वापरला गेला आहे. तसेच तो संस्कृत, हिंदी, अवस्ताई फारसी इत्यादींमध्ये वापरला गेला आहे. असे अनेक अहवाल सांगतात.


विकिपीडियावर प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार 'पती' हा शब्द खूप जुना आहे आणि त्याचा उगम आदिम इंडो-युरोपियन भाषेतून झाला आहे. इराणी भाषांमध्येही 'दमन-पैती' असे शब्द होते.


याशिवाय पतीसारखे शब्दही अनेक भाषांमध्ये आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ मालक असाही होतो. असे म्हणतात की, इंग्रजी 'डिस्पॉट' हा शब्द आहे, जो ग्रीक भाषेतील डेस-पोटिसपासून विकसित झाला आहे. याचा अर्थ मालक किंवा स्वामी असा होतो.


पती प्रत्यय शब्द?


राष्ट्रपती


क्षेत्रपति


करोड़पति


लक्ष्मीपती


उद्योगपती


प्रजापति


भूपती


वाचसपति


लखपति


लक्ष्मीपती


उद्योगपती


अशा स्थितीत हे लक्षात घ्या की, पति या शब्दासमोर जे शब्द ठेवले जातात, ते त्याच्या मालकाच्या अर्थाने वापरले जातात. तुम्हाला माहिती आहे की, जेव्हा दोन किंवा अधिक शब्द जोडून नवीन शब्द तयार होतो तेव्हा त्याला संयुग शब्द म्हणतात आणि त्या शब्दांच्या बेरीजला संयुग म्हणतात. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या समासातून असे शब्द बनवले जातात. जसा लाखाचा पती म्हणजे लखपती. यातील संबंध म्हणजे तत्पुरुष समास. हे अशा शब्दांबद्दल आपल्याला शाळेत देखील शिकले जातो.