मुंबई: भारतीय रुपया (Indian Rupee) हे भारताचं अधिकृत चलन आहे. भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा आणि नाणी वापरली जातात. कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी रुपयाचा वापर केला जातो. त्याशिवाय कोणतीही वस्तू किंवा सामान मिळत नाही. तुमच्याकडे 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा (Indian Currency) असतील. अनेकवेळा आपण या नोटांकडे बारकाईने पाहतो की त्यावर काय-काय आहे? नोटांच्या बाजूच्या तिरक्या रेषा ( Slanting Lines) तुमच्या लक्षात आल्या असतील. या ओळींचा अर्थ काय असा तुम्ही कधी विचार केला आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही सर्व नोटा बारकाईने पाहिल्या असतील, तर तुमच्या लक्षात आले असेल की पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांच्या काठावरच्या रेषा वेगळ्या आहेत. म्हणजेच 2 रुपयांच्या नोटेत कमी रेषा आणि 2000 रुपयांच्या नोटेत जास्त रेषा आहेत. नोटेच्या मूल्यानुसार त्यावरील रेषांमध्ये चढ-उतार होत असतात. या रेषा आणि त्यांचा अर्थ तुम्हाला आज सांगणार आहोत.


खूप खास असतात या रेषा


नोटांच्या बाजूला बनवलेल्या या रेषांना 'ब्लीड मार्क्स' (Bleed Marcus) म्हणतात. या रेषा विशेष आहेत कारण त्या दृष्टिहीन लोकांसाठी बनवल्या जातात. ज्यांना नोटा डोळ्यांनी पाहता येत नाहीत, त्यांना या रेषांद्वारे नोटांची किंमत समजू शकते. जेणेकरुन त्यांना कोणीही फसवू शकणार नाही. 50 रुपयांची की 2000 रुपयांची नोट आहे? हे या रेषांवर बोटं फिरवून अंध व्यक्ती नोटेचे मूल्य समजून घेऊ शकतात.


अंध व्यक्तींच्या सोयीसाठी बनवलेल्या या रेषा प्रत्येक नोटेवर त्याच्या मूल्यानुसार वेगवेगळ्या आहेत. तुम्ही 100 रुपयांची नोट पाहिली तर तुम्हाला तिच्या दोन्ही बाजूला चार रेषा दिसतील. दोनशेच्या नोटांवरही चार रेषा असतात, पण त्यासोबत दोन शून्यही जोडलेले असतात. पाचशेच्या नोटांवर पाच रेषा तर दोन हजाराच्या नोटांवर सात रेषा दिसतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व रेषा हातांना जाणवतात. जेणेकरुन अंध व्यक्तींना ते जाणवेल आणि त्यांना नोटेचे योग्य मूल्य कळू शकेल.