मुंबई : आपल्याला तर हे माहित आहे की, इंग्रजीमध्ये 26 अक्षर आहेत, परंतु त्यांपैकी पैकी दोन अशी अक्षरे आहेत ज्यावर बिंदू वापरला गेला आहे. आणि ते अक्षरं आहेत i आणि j. प्रत्येक भाषेत अशी अनेक अक्षरे आहेत जी अगदी वेगळी असतात किंवा त्यांच्यामध्ये एक बिंदू ठेवल्यावर त्यांच्या बोलण्याचा टोन किंवा उच्चार बदलतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की i आणि j वर वापरल्या गेलेल्या या बिंदूंना काय म्हणतात? तर आज आम्ही तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी मदत करत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Dictionary.com च्या रिपोर्टनुसार, i आणि j वरील बिंदूला शीर्षक म्हणतात. या प्रकारच्या बिंदूला ग्लिफ म्हणूनही ओळखले जाते, ज्यामुळे इतर भाषांमध्ये बिंदू लावल्याने अक्षराचा अर्थ बदलतो, परंतु इंग्रजीमध्ये मात्र बिंदू लागला तरी i आणि j म्हणून या शब्दांना वाचले जाते.


या प्रकारच्या डॉटची उत्पत्ती लॅटिन भाषेतून झाली आहे. ज्याला लॅटिनमध्ये Titulus म्हणतात. I आणि J मध्ये बिंदूंचा वापर लॅटिन हस्तलिखितांमध्ये 11 व्या शतकातील आहे. हस्तलिखितात शीर्षक लिहिताना i आणि j पासून शेजारची अक्षरे वेगळी करण्यासाठी हे केले गेले.


हे 1400 च्या उत्तरार्धात रोमन टाइपफेसमध्ये उद्भवले. अशा अनेक भाषा आहेत ज्यामध्ये ते वापरला जातो आणि बिंदूमुळे त्या वेगळ्या पद्धतीने दाखवल्या जातात आणि त्याचे अर्थ काढले जातात.


इतर भाषांमध्ये डॉटची ओळख झाल्यानंतर अक्षरांचे अर्थ बदलले असले, तरी इंग्रजीतील i आणि j सोबत तसे झाले नाही. लोअरकेस असो वा अप्परकेस, दोन्ही केसेसमध्ये या शब्दांना सारखेच उच्चारले जाते.