आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...
Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
Kolkata Rape Case: कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षित महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, या प्रकरणातील आरोपी संजय रॉयबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा संजय रॉयने मद्यपान केले होते. तर त्याच रात्री तो दोन रेड लाइट एरियामध्येदेखील गेला होता. इतकंच नव्हे तर संजय रॉयने त्याच रात्री रस्त्यावर एक महिलेसोबत छेडछाड केली होती. त्याचबरोबर एका महिलेकडे न्यूड फोटोदेखील मागितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितेनुसार, त्या रात्री आरोपी संजय रॉयने सेमिनार हॉलमध्ये जाण्यापूर्वी ऑपरेशन थेटरमध्येही गेला होता.
आरोपी संजय रॉयला पोलिसांनी 14 ऑगस्टरोजी ताब्यात घेतलं होतं. कोलकत्ताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी व प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करण्याच्या आरोपांतर्गंत त्याला अटक करण्यात आली होती. सध्या त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. संजय रॉय 2019पासून कोलकाता पोलिसांच्या डिजास्टर मॅनेजमेंट ग्रुपसोबत सिविक वॉलिंटियर म्हणून काम करतोय. संजय रॉयच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
संजय रॉयला अटक कशी केली?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉयला घटनेच्या दिवशी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या इमरजेन्सी बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्या गळ्यात ब्युट्यूथ डिव्हाइसदेखील आहे. त्यानंतर 40 मिनिटांनी तो बाहेर पडताना दिसत आहे. तेव्हा त्याच्या गळ्यातील ब्लुटूथ नसल्याचे दिसत आहे. पोलिसांना पीडित डॉक्टर महिलेच्या मृतदेहाशेजारी ब्लुटुथ डिव्हाइस पडलेले दिसले. हे डिव्हाइस आरोपी संजय रॉयच्या मोबाइलसोबत कनेक्ट होते. या प्रकारे पोलिसांना या अमानुष हत्याकांडातील आरोपीची लिंक मिळाली.
कोलकाता पोलिसांच्या तपासणीत आढळले की, रॉयच्या मोबाईल फोनमध्ये अनेक हिंसक आणि अश्लील व्हिडिओ क्लिप होत्या. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, संजय रॉयने लगेचच त्याचा गुन्हा कबुल केला होता. तसंच, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला फाशीदेखील देऊ शकता, असंदेखील त्याने म्हटलं होतं. संजय रॉयच्या शेजाऱ्यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने अनेकवेळा लग्न केलं आहे. त्याच्या तीन पत्नी त्याच्या स्वभावामुळं त्याला सोडून निघून गेल्या तर त्याची चौथी पत्नी मागील वर्षी कर्करोगाने निधन पावली.