Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाची तपासणी आता सीबीआय करत आहे. त्यांनी आतापर्यंत 19 जणांची चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे झाले आहेत. मानवी अवयवांच्या अवैध व्यापाराचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न थांबवण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला मार्गावरून हटवण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून आणि डॉक्टरांच्या बॅचमेट्सच्या वक्तव्यावरून सीबीआयला तपासात समोर आलाय. (Kolkata Doctor Murder rape case update Hospital human organ trafficking Drug Racket CBI sources claim)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चौकशीदरम्यान निम्म्याहून अधिक लोकांनी रुग्णालयातून मानवी अवयवांच्या तस्करीच्या रॅकेटची माहिती दिलीय. लवकरच अनेक व्हाईट कॉलर चेहरे समोर येतील असा सीबीआय टीमकडून दावा करण्यात आलाय. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची मुळे खूप खोलवर पसरलीय. ही सामान्य घटना आहे असे वाटावे म्हणून बलात्कार करण्यात आला, असं चौकशीत समोर आलंय. मेडिकल कॉलेजमध्ये दीर्घकाळ S*x आणि ड्रग रॅकेट चालवल्याचा आरोपही आहे. 23 वर्षांपूर्वी 2001 मध्ये कॉलेजच्या वसतिगृहात झालेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या लिंकही याच्याशी जोडल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. 


एका राजकीय पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दावा केला आहे की, त्याच्याकडे डॉक्टरांच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे स्क्रीनशॉट आहेत, ज्यामध्ये हॉस्पिटलमधील S*x आणि ड्रग रॅकेट उघड होतंय. त्यात दुसऱ्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा आणि त्यांच्या पुतण्याचा उल्लेख आढळलाय. 


हेसुद्धा वाचा - Kolkata Doctor Murder : लाल घोंगडी, निळा गालिचा आणि डोळे... डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट


सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुगावानंतर चौकशीदरम्यान वैद्यकीय महाविद्यालयातील 4 जणांची नावं समोर आलीय. यामध्ये तीन डॉक्टर आणि एक हाऊस स्टाफ आहे. हे चौघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित असून ते रुग्णालयात S*x आणि ड्रग रॅकेट चालवत असल्याचा दावा करण्यात आलाय. आता या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी ठोस पुरावे गोळा करत आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि आरजी कार मेडिकल कॉलेज - हॉस्पिटलमधील काही औषधे आणि वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम व्यवस्थापनाच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात आलं होतं, मात्र अटींनुसार पुरवठा होत नव्हता. याची माहिती पीडितेला होती. हे देखील या हत्येमागे कारण असण्याचा संशय सीबीआयला आहे. 


रुग्णालयातील एका डॉक्टरचा दावा आहे की, पीडितेने यापूर्वी आरोग्य भवनमध्ये याबाबत तक्रार केली होती. मात्र, आरोपींच्या प्रभावामुळे कारवाई झाली नाही. प्रशिक्षणार्थी डॉक्टर पुराव्यासह संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर उघड करण्याचा विचार करत होती.


9 ऑगस्टला वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली. रिपोर्टनुसार, त्याच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाली होती. गळा दाबल्याने थायरॉईड कूर्चा तुटला होता. पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या खुणा आहेत. त्याच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्म्याची काच फुटून त्याच्या डोळ्यात घुसली. याप्रकरणी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो कोलकाता पोलिसात नागरी स्वयंसेवक होता. 


प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या वडिलांनी शनिवारी (17 ऑगस्ट) रात्री बंगाली मीडियाला सांगितले की, संपूर्ण विभाग या घटनेत सामील आहे. आता कुठेतरी खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सेमिनार रूममध्ये आणल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी सेमिनार हॉलजवळ नूतनीकरणाच्या नावाखाली तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शुक्रवारी (16 ऑगस्ट) कोलकाता उच्च न्यायालयानेही बंगाल सरकारला गुन्ह्याच्या ठिकाणी नूतनीकरण करण्याच्या घाईबद्दल प्रश्न विचारला. डॉक्टरांचे विश्रामगृह बांधण्यासाठी ही तोडफोड केल्याचे सरकारने सांगितलंय.