Kolkata R G kar Rape And Murder Case: कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 9 ऑगस्टच्या रात्री 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत आहे. आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफी टेस्ट म्हणजेच लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली आहे. एकीकडे संजयची चौकशी केली जात असतानाच दुसरीकडे तांत्रिक पुराव्यांचा शोधही पोलिसांकडून सुरु आहे. या तांत्रिक तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या मोबाईलवरील एका मेसेजने प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे.


तो मेसेज प्रमुख पुरावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणीच्या मोबाईलवरुन शेवटचा मेसेज 9 ऑगस्टच्या रात्री पावणेतीन वाजता पाठवण्यात आला. म्हणजेच त्यावेळी ही पीडित तरुणी जिवंत होती, असं मानलं जात असल्याचं तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांच्या हवाल्याने 'आज तक'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्या रात्री पीडितेच्या एका चुलत भावाने तिला मेसेज पाठवला होता. ज्याचं उत्तर पीडितेच्या मोबाईलवरुन रात्री पावणेतीनच्या आसपास देण्यात आलं. तांत्रिक पुराव्यांनुसार पीडितेने ज्यावेळेस मेसेज पाठवला त्यावेळेस ती जिवंत होती असं दर्शवत असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. पीडितेने पाठवलेला शेवटचा मेसेज हा तपास यंत्रणांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मेसेज मानला जात आहे. हा एक प्रमुख पुरावा असून पीडितेच्या मृत्यूसंदर्भातील तपशील म्हणून त्याला तपासामध्ये फार महत्त्व असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.


हा मेसेज एवढा महत्त्वाचा काय


मात्र एकीकडे हा मेसेज मुख्य पुरावा मानला जात असतानाच तो खरोखरच पीडितेने पाठवला आहे की तिच्या मोबाईलवरुन अन्य कोणी हा मेसेज पाठवला आहे याचा तपास केला जात आहे. प्राथमिक तपासामध्ये पीडितेच्या मोबाईलवरुनच हा मेसेज पाठवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या या प्रकरणामध्ये पोलीस तांत्रिक पुरावे अधिक बळकट असावेत या दृष्टीने अनेक बारीकसारीक पुराव्यांचा तपशील गोळा करत आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारेच नेमका गुन्हा कधी घडला, कसा घडला यासारखी माहिती समोर येण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या हा मेसेज पाठवण्याआधी आणि पाठवल्यानंतर नेमकं काय घडलं याचा माग तपास यंत्रणांकडून काढला जात आहे.


नक्की वाचा >> Kolkata Rape: आरोपीच्या मांडीवर ओरबाडल्याच्या खुणा! रेड लाईट एरियात S*x का टाळला? तपासात म्हणाला, 'माझ्याकडे...'


अटक केली तेव्हा दारुच्या नशेत होता


कोलकाता पोलीस जेव्हा संजयला अटक करण्यासाठी फोर्थ बटालियन येथे पोहोचली तेव्हा तो दारुच्या नशेत होता. त्याला पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर त्याने, "मला फाशी द्या" असं पोलिसांना म्हटलं. अटकेच्या दुसऱ्या दिवशी संजयच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसत नव्हता. त्याने पोलिसांना सर्व प्रश्नांची शांततेत उत्तरं दिलं. यामध्ये त्याने घटनेनंतरचा घटनाक्रमही सांगितलं. त्या रात्री संजय ऑप्रेशन थेअटरमध्ये का गेला होता याचा पोलीस शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉय सेमिनार हॉल समजून ऑप्रेशन थेअटरमध्ये गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.