Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक झेंडा होता. हा झेंडा हायटेन्शन लाइनला लागल्याने करंट खाली आला आणि वेगाने पसरल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. 


ऊर्जामंत्री मुलांच्या भेटीला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिव बारात ज्या ठिकाणाहून जात होती, तिथे खूप सारे पाणी साचले होते. यामुळे करंट वेगाने पसरला. यानंतर घटनास्थळी खळबळ माजली. सर्व मुलांना कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऊर्जा मंत्री हीरालाल नागर यांनी जखमी मुलांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तसेच शक्य तितकी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले. 


दुर्घटनेनंतर गोंधळ 


दुर्घटना घडल्यानंतर सगळीकडे गोंधळाचे वातावरण तयार झाले. लोकांनी कसेबसे लहान मुलांना अंगा खांद्यावर घेतले आणि गाडीवरुन एमबीएस रुग्णालयात नेले. येथे वैद्यकीय टीमने मुलांवर तात्काळ उपचार सुरु केले. दुर्घटनेची बातमी संपूर्ण शहरात पसरली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उर्जा मंत्री हीरालाल नागर, आयजी रविंद्र गौडसहित अनेक अधिकारी एमबीएस चिकित्सालयात पोहोचले. त्यांनी जखमींची विचारपूस केली.



 


मुलांच्या उपचारात कोणतीही हयगय केली जाणार नाही. गरज भासल्यास मुलांना उच्च स्तरीय रुग्णालयात पाठव्यात येईल, असे यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. 


एका मुलाची स्थिती गंभीर 



जखमींच्या उपचारात कोणच्या गोष्टीची कमी पडता कामा नये. त्यांना गुणवत्तापूर्वक उच्च स्तरीय उपचार मिळायला हवेत, असे निर्देश ओम बिर्ला यांनी रुग्णालयाला दिले. जखमींमध्ये सर्व मुले ही 10 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत. एक मुलगा 70 टक्के तर दुसरा मुलगा 50 टक्के जळाला आहे. इतर मुले 10 टक्के जखमी आहेत.