मुंबई : खाजगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या वैशिष्ट्याला DIY म्हणजेच Do-It-Yourself असे नाव देण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने, कर्ज घेणारे ग्राहक त्यांच्या जुन्या आणि चुकलेले ईएमआय स्वतः भरू शकतील. हे फीचर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगसह सुसज्ज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे एक असे फीचर आहे, जे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार वापरू शकतात. बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फीचर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कस्टमर हिस्ट्री आणि कस्टमर इंटरेक्शन डेटाला अ‍ॅनलाइझ करेल. या अ‍ॅनालिसेसच्या आधारे ग्राहकांला सर्व सुविधा मिळतील.


हे फीचर इतके फ्रेंडली आणि सोपे ठेवण्यात आले आहे की, ग्राहक त्याच्या आवडीची भाषा, योग्य वेळ आणि कम्युनिकेशन मोड निवडू शकतात.


जेव्हा ग्राहक DIY फीचरचा वापर करेल, तेव्हा हे फीचर चुकलेले किंवा राहिलेले EMIs भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देईल. ज्यांना जुने ईएमआय भरायचे आहे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी बँकेने हे वैशिष्ट्य सुरू केले आहे. म्हणूनच ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.


ग्राहकाला सर्वोत्तम पर्याय सांगेल


बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, DIY प्लॅटफॉर्म परतफेडीसाठी सर्वोत्तम पर्याय कोणता असेल याचा पर्याय देखील देईल. हे बँकेच्या अंतर्गत मार्गदर्शनापेक्षा पूर्णपणे वेगवेगळे असेल.


डेबिट कार्डवर नो-कॉस्ट ईएमआय सुविधा


आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेने नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा सुरू केली आहे. डेबिट कार्ड धारकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. याअंतर्गत डेबिट कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड प्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर नो कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळत आहे. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदीसाठी वापरले जाऊ शकते.