बंगळुरु : आता आम्ही तुम्हाला एक असा बैल दाखवणार आहोत ज्याची किंमत ऐकून तुम्ही चाट पडाल. या बैलाची किंमत एक दोन लाख नाही तर तब्बल कोटीच्या घरात आहे. कुठला आहे हा बैल, या बैलात अशी काय खासियत आहे, ज्यामुळे तो इतका महागडा ठरलाय?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा काही साधासुधा बैल नाही. त्याची किंमत ऐकाल तर तुम्ही चक्रावून जाल. हा आहे कृष्णा बैल. बंगळुरूतल्या कृषी मेळाव्यात ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चा आहे ती फक्त कृष्णा बैलाचीच. उमदा, देखणा आणि बघताच क्षणीच कुणाच्याही नजरेत भरेल असा हा डौलदार कृष्णा, सर्वांच्याच आकर्षणाचा विषय बनलाय. त्यामुळेच कृष्णावर तब्बल एक कोटीची बोली लागलीय.  (Krishna bull sells for Rs 1 crore Price at Krishi Mela in Bengaluru)



हल्लीकर प्रजातीच्या या बैलाचं वजन जवळपास 800 ते 1000 किलो इतकं असतं तर उंची साडे सहा ते 8 फूट इतकी असते. ही प्रजाती नष्ट होत असल्याने या बैलांच्या वीर्याला प्रचंड मागणी आहे. कृष्णा बैलाच्या विर्याच्या एका डोसची किंमत जवळपास एक हजार रूपये इतकी आहे. त्यामुळे बंगळुरूच्या कृषी प्रदर्शनात कृष्णा भलताच भाव खाऊन गेला आहे. इथं येणारा प्रत्येक जण जाताना हेच म्हणतोय, बैल असावा तर कृष्णासारखा.