उन्नाव प्रकरण : आमदार कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांचा कारावास
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेनगर कारावासाची शिक्षा.
लखनऊ : उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेनगर याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा (Kuldeep Sengar life imprisonment) ठोठावण्यात आली आहे. भाजपने पक्षातून निलंबित केलेला उत्तर प्रदेशातील आमदार कुलदीप सिंह सेनगर याला आज ही कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या केल्याच्या आरोपात कुलदीपसिंह सेनगर दोषी ठरला होता. न्यायालयाने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले होते. यावेळी न्यायालयाने त्याला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवले होते.
सेनगर याला २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने दोषी ठरवले होते. न्यायालयाने याप्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर, तत्कालीन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालीन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह तर्था बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह तथा सुमन सिंह, जयदीप सिंह तथा अतुल सिंह यांना प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये २०१७ मध्ये त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार केले होते. चार वेळा आमदार असलेल्या कुलदीपसिंह याची ऑगस्ट महिन्यात भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. त्याच्यावर कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचणे), ३६३ (अपहरण), ३६६ (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), ३७६ (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) संबंधित इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.