बंगळुरु : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार आहे. पण हे सरकार बनवण्याआधी कर्नाटकमध्ये मोठं सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. सगळ्यात कमी जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्रीपद मिळालं. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सगळं काही अलबेल आहे असं दिसत नाही. त्यामुळे हे सरकार पडेल अशी शक्यता वाटत आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शनिवारी म्हटलं की, 3 सप्टेंबरला राज्यात नवे मुख्यमंत्री शपथ घेतील. 


कुमारस्वामी काय बोलले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुमारस्वामी यांनी म्हटलं की, '3 सप्टेंबरला नवे मुख्यमंत्री शपथ घेतील. हे महत्त्वाचं नाही की मी किती दिवस मुख्यमंत्री असू. माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की, मी जेवढे दिवस ही राहिल आपल्या कामांनी भविष्य सुरक्षित करेल.'


मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या या वक्तव्याच्या 1 दिवसाआधी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धारमैया यांनी म्हटलं होतं की, ते पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. हासनमधील एका सभेत सिद्धारमैया यांनी म्हटलं की, 'जनतेच्या आशिर्वादाने मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होईल. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षाने हात मिळवणी केली आहे. मला वाटलं होतं की लोकं मला पुन्हा मत देतील आणि विजयी करतील पण असं नाही झालं, पण राजकारणात जय-पराजय सामान्य आहे." 



सरकार पडणार असल्याची चर्चा


याआधी कुमारस्वामी तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री बनून मी विष पित आहे. त्यामुळे हे सरकार पडतं की काय अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये तेव्हा दोन्ही पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली तेव्हा देखील दोन्ही पक्षांमध्य़े असेलले मतभेद समोर आले होते.


भाजप सर्वात मोठा पक्ष


कर्नाटक हे एकमेव मोठं राज्य आहे जेथे काँग्रेस सत्तेत आहे. भाजप कर्नाटकमध्ये 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बीएस येदियुरप्पा विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करु शकले नाहीत आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसने निकालानंतर लगेचच जेडीएसचा पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर जेडीएसचे एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले होते. काँग्रेसकडे 78 आणि जेडीएसचे 37 आमदार आहेत.