मुंबई : 200 रुपये उधार मागून लॉटरीचं तिकीट विकत घेणाऱ्या एका मजुराला चक्क दीड कोटींची लॉटरी लागली आहे. या मजुराला लॉटरी लागल्यानंतर ही बातमी संपूर्ण गावात पसरली. सुरुवातीला तर कोणालाच यावर विश्वास बसत नव्हता पण नंतर सत्य कळाल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील मनोज कुमार नावाच्या या व्यक्तीला ही दीड कोटींची लॉटरीट
लागली आहे. ही व्यक्ती मजुरी करुन आपल्या कुटुंबाचं पोट भरतो. मजुर असला तरी मनोज कुमारला नेहमी श्रीमंत होण्याची इच्छा होती. सिनेमे पाहून त्यांनी लॉटरीमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आणि ते सत्यात उतरलं. अनेक दिवसांपासून ते लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. काही दिवसांपूर्वाच मनोज कुमारला माहिती मिळाली की पंजाब राज्य राखी बंपर 2018 ऑटरी आणणार आहे. त्यानंतर त्यांनी याचं तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.


मनोज कुमारकडे तिकीट खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते. सुरुवातील मनोजने पैसे नसल्यामुळे लॉटरी न खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण अचानक त्याच्या मनात लॉटरीच्या तिकीटाबाबत उत्सूकता जागृत झाली आणि एका मित्राकडून 200 रुपये उसणे घेऊन त्याने लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. पण मनोज कुमारलाही ही गोष्ट माहित नसेल की हे तिकीट त्याचं भविष्यच बदलून टाकेल.


पंजाब राज्य राखी बंपर 2018 लॉटरीचे प्रवक्त्यांनी माहिती दिली की, मनोज कुमारने बुधवार लॉटरीचे डायरेक्टर टीपीएस फुलका यांची भेट घेतली आणि दावा केला. डायरेक्टरने लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं. लॉटरीच्या लकी ड्रॉची घोषणा 29 ऑगस्टला झाली होती. पहिल्या 2 विजेत्यांना दीड कोटींचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.