फाशी झाली तरी चालेल, पण भाजपासोबत समझोता नाही-लालू
धोकेबाज आणि खोटं बोलणाऱ्यांना सरकारमधून हटवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं लालू यादव यांनी म्हटलं आहे.
पाटणा : फाशी झाली तरी चालेल, पण भाजपासोबत समझोता करणार नाही, असं राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. धोकेबाज आणि खोटं बोलणाऱ्यांना सरकारमधून हटवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं लालू यादव यांनी म्हटलं आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी आणि बिहारमध्ये नितीश कुमार सरकार विरोधात राजदचे लालू प्रसाद यादव आणि २२ विरोधी पक्ष एकवटले आहेत. देशातील भाजपा आणि राज्यातील राजग सरकार लोकशाहीला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पाटणातील स्थानिक मैदानात राजदची भाजपा भगाओ, देश बचाओ रॅली होती, त्याला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश सिंह, जदयूचे बंडखोर नेते शरद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझादही उपस्थित होते.