रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांना आता वरच्या न्यायालयात अपील करावी लागणार आहे. लालू प्रसाद यादव यांना जामीन नाकारण्यात आला आहे. 


जामीन नाकारला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर लालू प्रसाद यादव यांना 3 वर्षापेक्षा कमीची शिक्षा राहिली असती तर त्यांना जामीन मिळाला असता, मात्र आता लालू यादव यांना जेलमध्ये राहावं लागेल.


साडेतीन वर्षाची शिक्षा


चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच पाच लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. चारा घोटाळ्याचं हे दुसरं प्रकरण आहे. रांची कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.