चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण
आरोपी लालूप्रसाद यादव यांनी आज रांचीत सीबीआय न्यायालयात शरणागती पत्करली.
रांची : चारा गैरव्यवहारप्रकरणातले मुख्य आरोपी लालूप्रसाद यादव यांनी आज रांचीत सीबीआय न्यायालयात शरणागती पत्करली. २४ ऑगस्टला न्यायालयाने लालूंना शरण येण्याचे आदेश दिले होते. २३ डिसेंबर २०१७ ला लालूप्रसाद यादव यांना या प्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र ११ मेला तब्येत खराब असल्यामुळे ६ आठवड्यांचा जामीन लालूंना मिळाला होता.
उपचारांसाठी रुग्णालयात
दोन वेळा हा जामीन वाढवून देण्यात आला. मात्र तिसऱ्यांदा जामीन वाढवण्यास कोर्टाने नकार दिला. कोर्टात शरण आल्यावर लालू यादव यांना जेलमध्ये नेण्यात येईल. त्यानंतर हायकोर्टच्या आदेशानुसार उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात येणार आहे.