ISRO's Mangalyaan-2 : चंद्रानंतर आता मंगळ ग्रहावर ISRO चे यान लँडिंग करणार आहे.  ISRO ने  Mangalyaan-2 मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत  लँडर, रोव्हर आणि हेलिकॉप्टर मंगळ ग्रहावर उतरवले जाणार आहेत. ISRO ची अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्स ऑर्बिटर मिशन (MOM) यशस्वी झाल्यानंतर  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने दुसरी मंगळ मोहीम हाती घेतली आहे. मार्स लँडर मिशन (MLM) असे या Mangalyaan-2  मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळ ग्रहाभोवती फिरणारे ऑर्बिटर पाठवले जाणार आहेत. कम्युनिकेशन रिले ऑर्बिटर (CRO) असणार आहेत. हे ऑर्बिटर मंगळावर उतरणाऱ्या भारतीय अवकाशयानाशी म्हणजेच लँडरशी जोडेल जाणार आहेत. हे ऑर्बिटर टेलिफोन एक्सचेंजसारखे काम करतील. या ऑर्बिटरवर VNIR आणि IR कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने मंगळ ग्रहाच्या वातावरणातील गतिशीलता हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  2031 मध्ये इस्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात लाँच केला जाणार आहे.


या मोहिमेअंतर्गत मार्स लँडर मिशन (MLM)  LVM-3 रॉकेटमधून प्रक्षेपित केला जाईल. याआधी मार्स कम्युनिकेशन रिले ऑर्बिटर लाँच केले जाणार आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर एमएलएम उतरवण्यासाठी सुपरसॉनिक पॅराशूटचा वापर केला जाणार आहे. रोव्हरच्या लाँंचिंगसाठी स्काय क्रेन  तयार केली जाणार आहे. 


Mangalyaan-2 लाँच केले जाणार 'हे' खास पेलोड


ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार... हे पेलोड मंगळाग्रहाच्या पृष्ठभागाखाली अभ्यास करणार आहे. 
UV-TIR स्पेक्ट्रोमीटर... या पेलोडच्या मदतीने मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या खनिजांचा नकाशा तयार केला जाणार आहे.. 
रमन स्पेक्ट्रोमीटर... यचा पेलोडच्या मदतीने मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेतला जाणार आहे.  
मायक्रोस्कोपिक कलर इमेजर... या पेलोडच्या मदतीने पृष्ठभागाच्या बाह्य रचना आणि मातीचा अभ्यास केला जाणार आहे. 
स्टिरिओ कॅमेरा...  भूगर्भीय आणि नेव्हिगेशन अभ्यास करण्यासाठी या पेलोडची मदत घेतली जाणार आहे.  भौगोलिक स्थानानुसार दिशा शोधण्यासाठी देखील या पेलोडची मदत होणार आहे. 
धूळ विश्लेषक... हे पेलोड वातावरणातील धुळीचा अभ्यास करेल. 
याशिवाय, रेडिएशन बजेट मॉनिटरिंग आणि इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन हे पेलोड देखील मंगळ ग्रहावर पाठवले जाणार आहेत.