गुवाहाटी : गेल्या चार दिवसांपासून ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरानं धुमाकूळ घातलाय. आसाममध्येही भीषण पूरस्थिती निर्माण झालीय. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जवळपास 26 जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय.


पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना या पूराचा फटका आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांनाही बसलाय. पार्कमध्ये सर्वत्र पूराचं पाणीच पाणी पाहायला मिळतंय. इथले प्राणी सुरक्षित जागेच्या शोधात फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. पूराच्या पाण्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येतेय. पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्राणी रस्त्यावर आलेत.


पाहा 'काझीरंगा'मधली भीषण दृश्यं