गेल्या २४ तासात देशात ५५ हजारहून अधिक नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांवर
कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ...
नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 55 हजार 79 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 27,02,743 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांचा आकडा 50 हजारच्या पार गेला आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी मृतांचा आकडा कमी असला तरीही जगाच्या तुलनेत भारतातील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. दिवसभरात 876 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 51,797 झाली आहे.
देशाता कोरोना रुग्ण सतत वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. देशात आतापर्यंत 19,77,780 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 6,73,166 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ICMR दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्टपर्यंत देशात 3,09,41,264 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सोमवारी एका दिवसात 8,99,864 चाचण्या करण्यात आल्या.
भारतात कोरोनामुळे पहिला बळी हा 12 मार्च रोजी झाला आहे. सौदी अरबमधून आलेल्या कर्नाटकमधील 76 वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला.