नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रसार देशभरात अतिशय झपाट्यानं होत असल्यामुळं आता चिंतेत भर पडू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ४०,४२५ नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना रुग्णांचा हा उद्रेक पाहता आता देशभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येनं ११ लाखांचा आकडा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 


सध्याच्या घडीला देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे. 


मोठा दिलासा : मुंबईतील कोरोना नियंत्रणात येणार, देशातील परिस्थितीही बदलणार 


 



आयसीएमआरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी देशभरात जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. देशात. सद्यस्थितीला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोना फोफावताना दिसत आहे. हे एकंदर चित्र पाहता रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा आरोग्य यंत्रणांपुढं मोठी आव्हानं उभी करत असून नागरिकांनाही धास्ती देऊन जात आहे.