नवी दिल्ली : भारतात कोरोना संक्रमणाची गती थांबत नाहीये. जगातील अनेक देशांमध्ये ही गती नियंत्रणात आली आहे. पण भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण वाढत आहेत. भारतात आतापर्यंत 42,80,423 लोकं कोरोना संक्रमित झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 72,775 लोकांचा बळी गेला आहे. देशातील 33,23,951 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अजूनही 8,83,697 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात मागील 24 तासात कोरोनाचे 75,809 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार देशात कोरोना चाचणीचा आकडा 5 कोटींच्या पुढे गेली आहे. काल (7 सप्टेंबर) पर्यंत भारतात 5,06,50,128 चाचण्या झाल्या असून सोमवारी 10,98,621 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.


सोमवारी राष्ट्रीय राजधानीत कोरोनाचे 2,077 नवीन रुग्ण वाढले. ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1.93 लाखांवर गेली. दिल्लीत गेल्या 24 तासांत 32 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर मृतांची संख्या 4,599 वर पोहचली आहे