मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी १२ जानेवारीला मतदान होतं आहे. या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. सहाव्या टप्प्यात ७ राज्यात ५९ जागांवर मतदान होतं आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या ५९ जागांपैकी ४६ जागा भाजपाकडे असून त्या कायम राखण्याचं आव्हान भाजपपुढे असणार आहे. सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात. आणि यूपीची हवा पूर्वांचल ठरवते. सहाव्या टप्प्यात ज्या १४ जागांवर मतदान होतं आहे. त्यातल्या १३ जागा एनडीएकडे होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारावर जोर असणार आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची लढत भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्याशी होते आहे. गुणा मतदारसंघात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हरियाणातील १० पैकी ७ जागा भाजपानं गेल्या वेळी जिंकल्या होत्या. 


अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. तर दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचं भाजपाचं उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजप, आप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत आहे.