जयललिता यांनी उच्चारलेलं शेवटचं वाक्य,ऑडीओ क्लिप आली समोर
तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाने त्यांच्या आवाजाची रेकॉर्डींग समोर आणली आहे.
नवी दिल्ली : तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाने त्यांच्या आवाजाची रेकॉर्डींग समोर आणली आहे. माझा रक्तदाब (ब्लड प्रेशर) १४०/८० हा माझ्यासाठी सामान्यच असल्याचे त्या डॉक्टरला सांगत होत्या. ड्युटीवर असलेल्या एका डॉक्टरने जयललिता यांना त्यांचा ब्लडप्रेशर १४० म्हणजे जास्त असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी विचारले १४० बाय किती आहे ? त्यावर डॉक्टरने १४०/८० असे उत्तर दिले. त्यावर त्या उत्तरल्या, 'हे माझ्यासाठी ठीक आहे...नॉर्मल आहे.' जयललिता यांच्या आवाजाची रेकॉर्डिंग न्यायमूर्ति ए अरूमुगस्वामी शोध आयोगाला शनिवारी उपलब्ध केली गेली. आवाजाची रेकॉर्डिंग डॉ. के.एस शिवकुमार यांनी केली होती. जयललिता यांनी हिरव्या शाईने लिहिलेला एक चार्टदेखील उपलब्ध केला गेला. यामध्ये त्या आपल्या स्वास्थ्य आणि जेवणाच्या बाबतीत सतर्क दिसल्या.
संशयास्पद मृत्यू ?
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूबाबत पक्षातूनच शंका उत्पन्न करण्यात आली होती. विधानसभेचे सभापती राहिलेले AIADMKचे ज्येष्ठ नेते पी.एच. पंडियन यांनी जयललितांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटल होतं. त्यांनी शशिकला यांचं थेट नाव घेणं टाळलं असलं तरी त्यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केला होता.